• Download App
    गोटाबाय राजपक्षेंचे मालदीवला पलायन; भारताने मदत केल्याचा आरोप हाय कमिशनने फेटाळला| Gotabay Rajapaksas flee to Maldives; The High Commission has denied allegations that India helped

    गोटाबाय राजपक्षेंचे मालदीवला पलायन; भारताने मदत केल्याचा आरोप हाय कमिशनने फेटाळला

    वृत्तसंस्था

    कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे अखेर श्रीलंकेतून मालदीवला पळून गेले आहेत. पत्नी आणि दोन सुरक्षारक्षकांसह लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून त्यांनी मालदीवला पलायन केले. श्रीलंकन लष्कराने अधिकृतपणे गोटाबाय राजपक्षे मालदीव मध्ये निघून गेल्याचे ट्विट केले आहे.Gotabay Rajapaksas flee to Maldives; The High Commission has denied allegations that India helped

    मात्र, या संदर्भात भारत आणि गोटाबाय राजपक्षे यांना पळून जायला मदत केल्याचा आरोप श्रीलंकन मीडियाने केला होता. याबाबत भारतीय दूतावासाने हा आरोप फेटाळला असून भारत फक्त श्रीलंकेच्या जनतेला मानवतेच्या भावनेतून मदत करत आहे. तिथल्या राजकीय व्यवस्थेमध्ये कोणताही हस्तक्षेप भारताने केलेला नाही. त्यामुळे गोटाबाय राजपक्षे यांना श्रीलंकेतून निघून जाण्यास भारत आणि मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ट्विट भारतीय दूतावासाने केले आहे.



    गोटाबाय राजपक्षे यांनी 11 जुलै रोजी आपल्या राजीनामा पत्रावर स्वाक्षरी केली आहे. त्याची आज घोषणा होणे अपेक्षित आहे. मात्र त्याआधी गोटाबाय राजपक्षे यांनी लष्कराच्या हेलिकॉप्टर मधून मालदीवला निघून जाणे पसंत केले. श्रीलंकेत आता कदाचित पद सोडलेले पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांची हंगामी राष्ट्राध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे किंवा श्रीलंकन संसदेचे प्रमुख अभय विक्रमसिंघे हे हंगामी अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

    गोटाबाय राजपक्षे यांना श्रीलंकन लष्कराने मालदीव मध्ये पोहोचवले असले तरी बाकीच्या राजपक्षे कुटुंबाला पळून जाण्याला अटकाव केला आहे. माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विमानतळावरच रोखून परत घरी पाठवले होते. श्रीलंकेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानावर अर्थात जनाधिपती मंदिरय्यावर अद्यापही आंदोलकांचा ताबा असून आंदोलन तेथे मुक्त संचार करताना आढळत आहेत.

    Gotabay Rajapaksas flee to Maldives; The High Commission has denied allegations that India helped

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड