• Download App
    गुगलची कर्मचाऱ्यांना तंबी : कंपनीने म्हटले- कामगिरी सुधारा, तिमाहीचे निकाल चांगले न आल्यास बाहेरचा रस्ता|Google's warning to the employees The company said - improve the performance, the way out if the quarterly results are not good

    गुगलची कर्मचाऱ्यांना तंबी : कंपनीने म्हटले- कामगिरी सुधारा, तिमाहीचे निकाल चांगले न आल्यास बाहेरचा रस्ता

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गुगल कंपनीच्या सेल्स टीमने कर्मचाऱ्यांना त्यांची एकूण विक्री उत्पादकता आणि त्यांची स्वतःची उत्पादकता लक्षात घेता पुढील तिमाहीचे निकाल चांगले न आल्यास त्यांना कामावरून कमी केले जाणार असल्याची धमकी दिली आहे.Google’s warning to the employees The company said – improve the performance, the way out if the quarterly results are not good

    गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकतेच सांगितले की, कंपनीत कर्मचारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या मानाने काम खूप कमी होऊ लागले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना चांगले काम करा, त्यांची उत्पादने सुधारणे आणि ग्राहकांना मदत करणे यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, गुगल कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा इशारा देत असल्याची सांगितले गेले आहे.

    कामगिरी दाखवा अन्यथा कठोर कारवाईसाठी तयार रहा

    बिझनेस इनसाईडरच्या अहवालानुसार, गुगलच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कामगिरी दाखवण्यास किंवा पुढे कठोर निर्णय घेण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. व्यवस्थापन स्पष्टपणे कर्मचार्‍यांना टाळेबंदीसाठी तयार राहण्यास सांगत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, माणसे कामावरून कमी करायचे की नाही हे पुढील तिमाहीच्या कमाईच्या अहवालावर पूर्णपणे अवलंबून असेल.



    गुगलची दोन वर्षातील कमाई सर्वात कमी त्याचवेळी, काही गुगल कर्मचार्‍यांनी वेबसाइट इनसाइडरला सांगितले की, कंपनीच्या भरतीवर बंदी आल्यापासून ते घाबरले आहेत. त्यांना काढून टाकले जाण्याची भीती आहे. गेल्या तिमाहीत गुगलच्या महसुलातील वाढ दोन वर्षांतील सर्वात कमी होती. टेक कंपन्या दीर्घकाळापासून आव्हानांचा सामना करत आहेत. म्हणूनच यावर्षी आतापर्यंत Nasdaq कंपोझिट इंडेक्स 26 टक्क्यांनी घसरला आहे.

    कंपनीने दोन आठवड्यांसाठी कामावर बंदी घातली

    गेल्या महिन्यात गुगलचे सीईओ एरिक श्मिट यांनी कर्मचाऱ्यांना उत्पादकता वाढवण्यास सांगितले. जलद गतीने चांगले परिणाम कसे मिळवायचे याबद्दल सूचना मागितल्या. पिचाई म्हणाले की, आपली उत्पादकता जितकी जास्त असायला हवी तितकी नाही. ही चिंतेची बाब आहे. साधारणतः एका महिन्यापूर्वी जुलैमध्ये त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांचे पुनरावलोकन केले. दोन आठवड्यांसाठी नियुक्ती निलंबित केली. नंतर कंपनीने भरतीवरील स्थगिती वाढवली होती. आर्थिक मंदीमुळे नोकरभरती थांबवण्याची घोषणा करण्यात आली होती. गुगलने त्यावेळी अधिकृतपणे टाळेबंदीबद्दल चर्चा केली नसली तरी कर्मचारी चिंतेत होते.

    या विभागांमध्ये भरती केली जाणार आहे

    सुंदर पिचाई म्हणाले की. 2022 आणि 2023 मध्ये कंपनीचे लक्ष फक्त अभियांत्रिकी, तांत्रिक तज्ञ आणि महत्वाच्या पदांवर कर्मचारी भरती करण्यावर आहे. 2022 च्या पहिल्या भागात कंपनीने कर्मचाऱ्यांच्या भरतीचा कोटा पूर्ण केला आहे. पुढे जाण्यासाठी आपण अधिक उद्योजक बनले पाहिजे. योग्य लक्ष केंद्रित करून नेहमीच्या दिवसांपेक्षा यशासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत.

    Google’s warning to the employees The company said – improve the performance, the way out if the quarterly results are not good

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य

    Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबे म्हणाले- कोर्ट कायदा बनवणार असेल तर संसद बंद करा; सुप्रीम कोर्ट सीमा ओलांडत आहे

    Election Commission : 22 कोटी मतदार ‘आधार’शी लिंक नाहीत, घरोघरी जाऊन पडताळणी; निवडणूक आयोगाची मोहीम