• Download App
    गुगलने लाखोंची फसवणूक करणारे ॲप डिलीट केले; पहा संपूर्ण यादी! Google Deletes Millions Of Cheating Apps See the full list

    गुगलने लाखोंची फसवणूक करणारे ॲप डिलीट केले; पहा संपूर्ण यादी!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : युजर्सच्या संरक्षण करण्यासाठी Google नवीन पावलं उचलत आहे. गुगलने अलीकडेच 18 स्पाय लोन ॲप्स डिलीट केले आहेत. लाखो लोकांनी हे ॲप्स प्ले स्टोअरवरून डाऊनलोडही केले होते. Google Deletes Millions Of Cheating Apps See the full list

    सॉफ्टवेअर कंपनी ईएसईटीने यासंदर्भात एक नवीन अहवालही जारी केला आहे. असे सांगण्यात आले की 18 ॲप्स ओळखले गेले आहेत जे ‘स्पायलोन’ अॅप्स म्हणून काम करत होते.

    हे ॲप्स कोणतीही माहिती न देता यूजर्सचा डेटा चोरत होते. अशा परिस्थितीत जर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्स असतील तर तुम्ही ते आजच डिलीट करा. नंतर कर्ज घेणाऱ्या युजर्सना ब्लॅकमेल करण्यासाठी या अॅप्सचा वापर करण्यात आला. या डेटाच्या आधारे ते वापरकर्त्याला कर्जाची परतफेड करण्यास भाग पाडायचे आणि जास्त व्याजाची मागणीही करायचे.

    ESET संशोधकांनी हे ॲप्स ओळखले आहेत जे वापरकर्त्यांची फसवणूक करण्यासाठी वापरले जात होते. या ॲप्सने आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि दक्षिण पूर्व आशियातील वापरकर्त्यांना लक्ष्य केले. गुगलला याबाबत माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत हे 17 ॲप काढून टाकले. आता अशा परिस्थितीत ज्या युजर्सनी हे अॅप डाऊनलोड केले आहे त्यांनीही ते त्वरित डिलीट करावे.

    Google ने कोणते ॲप्स काढले?
    AA Kredit, Amor Cash, GuayabaCash, EasyCredit, Cashwow, CrediBus, FlashLoan, PréstamosCrédito, Préstamos De Crédito-YumiCash, Go Crédito, Instantáneo Préstamo, Cartera grande, Finupp Lending, 4S Cash, TrueNaira, EasyCash या अपॅप्सचा समावेश आहे.

    Google Deletes Millions Of Cheating Apps See the full list

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे