जाणून घ्या कोणी घेतले आहे विकत?, कसा आला त्यांना अनुभव
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : गुगलचे सध्याचे सीईओ सुंदर पिचाई यांचे वडिलोपार्जित घर विकण्यात आले आहे. चेन्नईतील या घरात सुंदर पिचाई यांचे बालपण गेले. ते विकताना, घराची कागदपत्र सोपवतांना सुंदर पिचाईंचे वडील काही मिनिटांसाठी भावूक झाले होते. मात्र, ज्या व्यक्तीने हे घर घेतले त्या व्यक्तीनेही माणुसकी दाखवली. तामिळ अभिनेता सी मणिकंदनने हे घर विकत घेतले आहे. तामिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि निर्माता असलेल्या मणिकंदनने आता चेन्नईतील अशोक नगरमधील हे घर आपली मालमत्ता बनवले आहे. Google CEO Sundar Pichais ancestral house was sold his father became emotional while handing over the documents
सुंदर पिचाई जिथे जन्माला आले आणि वाढले ती मालमत्ता विक्रीसाठी काढल्याचा ऐकल्यावर मणिकंदनने लगेचच ती विकत घेण्याचा निर्णय घेतला. मणिकंदन म्हणाले, “सुंदर पिचाई यांनी आपल्या देशाचा अभिमान वाढवला आहे आणि ते जिथे राहत होते ते घर विकत घेणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद कामगिरी असेल.”
मणिकंदन यांना हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ लागला. मणिकंदन यांना चार महिने वाट पाहावी लागली कारण त्यावेळी गुगलचे सीईओ आरएस पिचाई यांचे वडील अमेरिकेत होते. स्वत: एक रिअल इस्टेट डेव्हलपर, मणिकंदन म्हणतात की त्यांनी त्यांच्या चेल्लाप्पा बिल्डर्स ब्रँड अंतर्गत सुमारे ३०० घरे बांधली आहेत. ते म्हणतात की ही सुंदर पिचाई यांची संपत्ती नाही तर गुगलच्या सीईओच्या पालकांच्या नम्रतेने त्यांच्यावर खूप प्रभाव पाडला आहे.
ते म्हणतात, “सुंदर यांच्या आईने स्वतः फिल्टर कॉफी बनवली होती आणि त्यांच्या वडिलांनी पहिल्याच भेटीत मला कागदपत्रे दिली होती.” “त्यांची नम्रता आणि नम्र दृष्टिकोन पाहून मी भारावून गेलो.” ते पुढे म्हणाले की सुंदर पिचाई यांच्या वडिलांना नोंदणी किंवा हस्तांतरण प्रक्रिया जलद करण्यासाठी सुंदर पिचाईंच्या नावाचा अजिबात वापर करयाचा नव्हता. त्यांनी तासंतास वाट पाहीली आणि सर्व आवश्यक कर भरले.
Google CEO Sundar Pichais ancestral house was sold his father became emotional while handing over the documents
महत्वाच्या बातम्या
- 2000 च्या नोटांची कायदेशीर वैधता 30 सप्टेंबर 2023 नंतरही चालूच राहणार!!; रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांचे स्पष्टीकरण
- दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केंद्राने आणला अध्यादेश; बदली-पोस्टिंगचा निर्णय एकट्या मुख्यमंत्र्यांना नाही घेता येणार!
- ‘ज्ञानवापी’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती
- 2000 च्या नोटा मागे घेणे हा नोटबंदीचा धक्का नव्हे; तर छोट्या करन्सी कडे जाण्याचा मार्ग!!