अजित डोवाल यांच्या चीन दौऱ्यात झाला करार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Good News राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची बुधवारी भेट झाली. बैठकीत दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये फलदायी चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सहा कलमी मागण्यांवर एकमत झाले. यामध्ये सीमेवर शांतता राखणे आणि संबंधांच्या निरोगी आणि स्थिर विकासाला चालना देणे समाविष्ट आहे. Good News
या बैठकीनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक प्रेसनोट जारी केली. चीनी प्रेसनोटनुसार, पाच वर्षांनंतर झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंनी सीमा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. दोन्ही बाजूंनी सीमावर्ती भागात शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंधांच्या निरोगी आणि स्थिर विकासाला चालना देण्यावर सहमती दर्शवली आहे. बैठकीत दोन्ही बाजूंनी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला.
दोन्ही देशांनी सीमा विनिमय आणि सहकार्य मजबूत करण्यावर सहमती दर्शवली. भारताने तिबेट आणि चीनमधील तीर्थयात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा केली. दोन्ही देशांनी नाथुला सीमेवरील व्यापाराला चालना देण्याचेही मान्य केले.
परराष्ट्र मंत्रालयाने आणखी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. यावेळी वांग म्हणाले की, दोन्ही देशांच्या नेत्यांनी भारत-चीन संबंधांच्या पुनर्स्थापने आणि विकासाबाबत चर्चा केली. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, दोन्ही देशांदरम्यान बऱ्याच काळापासून चढ-उतार होत आहेत. पण आता संबंध पुन्हा सामान्य होत आहेत. मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. हे जपलं पाहिजे.