• Download App
    कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; जनरल तिकीट आणि शनयकक्षात बेडिंगची सुविधा देणार। Good news for Konkan Railway passengers; General tickets and bedding will be provided in the long rut

    कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; जनरल तिकीट आणि शनयकक्षात बेडिंगची सुविधा देणार

    वृत्तसंस्था

    पणजी : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. देशभरात कोरोना स्थिती आटोक्यात आल्याने भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासातील निर्बंध शिथील केले आहेत. रेल्वे मंत्रालयाने लांबच्या पल्ल्यांच्या प्रवासासाठी जनरल तिकीट विक्रीही सुरू केली आहे. Good news for Konkan Railway passengers; General tickets and bedding will be provided in the long rut

    कोकण रेल्वेतून दरदिवशी ४८ गाड्या सोडल्या जातात. त्यातून ८० हजार लोक प्रवास करतात. कोकण रेल्वे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून शनयकक्षात बेडिंगची सुविधा पूर्ववत उपलब्ध करून देणार आहे.



    यापूर्वी रेल्वेकडून वातानुकुलित डब्यातील प्रवाशांना बेडिंगची सुविधा पुरविण्यात येत होती. बेडिंगची सुविधेंतर्गत उशी, बेडसीट आणि ब्लँकेट रेल्वेकडून पुरविण्यात येत होते. मात्र, कोरोना संसर्ग वाढल्यामुळे २०२० मध्ये रेल्वे मंत्रालयाने ही सुविधा पुरविणे बंद केले होते. ही सुविधा पूर्ववत करण्यात येत असल्याने त्याचा लाभ कोकण रेल्वेतून प्रवास करणार्‍या प्रवाशांनाही होणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाडगे यांनी दिली.

    Good news for Konkan Railway passengers; General tickets and bedding will be provided in the long rut

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court : हायकोर्टाचा सैनिकांच्या बाजूने निर्णय; म्हटले – जीवनशैलीतील विकार सांगून दिव्यांगत्व पेन्शन थांबवू शकत नाही

    DGCA : विमान तिकीट परताव्याच्या नियमांमध्ये बदल; बुकिंगच्या 48 तासांत रद्द किंवा बदल केल्यास अतिरिक्त शुल्क लागणार नाही

    Barmer Rajasthan : बाडमेरमध्ये जमिनीतून निघाले क्रूड ऑईल, 55 हून अधिक टँकर भरले, स्फोटामुळे घरे-शाळांना तडे