• Download App
    कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; जनरल तिकीट आणि शनयकक्षात बेडिंगची सुविधा देणार। Good news for Konkan Railway passengers; General tickets and bedding will be provided in the long rut

    कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; जनरल तिकीट आणि शनयकक्षात बेडिंगची सुविधा देणार

    वृत्तसंस्था

    पणजी : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. देशभरात कोरोना स्थिती आटोक्यात आल्याने भारतीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासातील निर्बंध शिथील केले आहेत. रेल्वे मंत्रालयाने लांबच्या पल्ल्यांच्या प्रवासासाठी जनरल तिकीट विक्रीही सुरू केली आहे. Good news for Konkan Railway passengers; General tickets and bedding will be provided in the long rut

    कोकण रेल्वेतून दरदिवशी ४८ गाड्या सोडल्या जातात. त्यातून ८० हजार लोक प्रवास करतात. कोकण रेल्वे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून शनयकक्षात बेडिंगची सुविधा पूर्ववत उपलब्ध करून देणार आहे.



    यापूर्वी रेल्वेकडून वातानुकुलित डब्यातील प्रवाशांना बेडिंगची सुविधा पुरविण्यात येत होती. बेडिंगची सुविधेंतर्गत उशी, बेडसीट आणि ब्लँकेट रेल्वेकडून पुरविण्यात येत होते. मात्र, कोरोना संसर्ग वाढल्यामुळे २०२० मध्ये रेल्वे मंत्रालयाने ही सुविधा पुरविणे बंद केले होते. ही सुविधा पूर्ववत करण्यात येत असल्याने त्याचा लाभ कोकण रेल्वेतून प्रवास करणार्‍या प्रवाशांनाही होणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाडगे यांनी दिली.

    Good news for Konkan Railway passengers; General tickets and bedding will be provided in the long rut

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकात मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकवायची मारामार; पण त्यांना आता आठवला प्रोटोकॉल!!

    Kavinder Gupta : लडाखमध्ये LG आणि हरियाणा-गोव्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती; कविंदर गुप्ता यांना केंद्रशासित प्रदेशाची जबाबदारी

    India iphone : भारतात आयफोन बनवणाऱ्या अभियंत्यांना चीनने परत बोलावले; केंद्र सरकारने म्हटले- ॲपलकडे अजूनही पुरेसे अभियंते