देशात लसींचा तुटवडा निर्माण झालेला असताना भारत बायोटेक या भारतीय कोव्हॅक्सिन लसनिर्मिती कंपनीने भारतवासियांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. भारत बायोटेक कंपनीने आपली लसनिर्मिती क्षमता २० कोटी डोसने वाढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनीची लसनिर्मितीची क्षमता वर्षाला १०० कोटी होणार आहे. Good news for Indians, Bharat Biotech’s vaccine production capacity to increase by Rs 20 crore
प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात लसींचा तुटवडा निर्माण झालेला असताना भारत बायोटेक या भारतीय कोव्हॅक्सिन लसनिर्मिती कंपनीने भारतवासियांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. भारत बायोटेक कंपनीने आपली लसनिर्मिती क्षमता २० कोटी डोसने वाढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनीची लसनिर्मितीची क्षमता वर्षाला १०० कोटी होणार आहे.
भारत बायोटेक कंपनीने भारतीय वैद्यक परिषदेच्या (आयसीएमईआर) सहकार्याने कोव्हॅक्सिन ही लस निर्माण केली आहे. ही लस कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी असल्याचे सिध्द झाले आहे. कंपनीतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की २० कोटीने क्षमता वाढल्यावर भारत बायोटेक दरवर्षी १०० कोटी डोस निर्माण करू शकेल.
भारत बायोटेकची उपशाखा असलेल्या गुजरातमधील अंकलेश्वरमधील कंपनीत उत्पादन सुरू होणार आहे. याठिकाणी २० कोटी कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन सुरू होणार आहे. त्यासाठी इनअॅक्टिव्हेटेट व्हेरेसेल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाणार असल्याचे भारत बायोटेकतर्फे सांगण्यात आले आहे. साधारणत: वर्षअखेरीपर्यंत अंकलेश्वरच्या प्लॅँटमध्ये लसींचे उत्पादन सुरू होणार आहे.
सध्या भारत बायोटेकची दर वर्षी ७० कोटी डोस उत्पादित करण्याची क्षमता आहे. भारत बायोटेककडून निर्माण होणाऱ्या लसीम्ये निष्क्रिय विषाणूंचा वापर केलेला असतो. त्यामुळे ही निष्क्रिय लस सुरक्षित असली, तरी ती निर्माण करणे अत्यंत गुंतातगुंताचे आणि महाग असते. जिवंत विषाणूंचा वापर करून निर्माण केलेल्या लशीपेक्षा या लशीचे कमी उत्पादन होते.
भारतात प्रथमच बीएसएल-३ सुविधा निर्माण झाली असून, त्यामुळे कंपनी कोव्हॅक्सिनची उत्पादन क्षमता वाढू शकते. भारत बायोटेकला कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्यासाठी ६५ कोटी रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले आहे. त्यामध्ये भारत बायोटेकसह हाफकीन इन्स्टिट्यूटचाही समावेश आहे.
Good news for Indians, Bharat Biotech’s vaccine production capacity to increase by Rs 20 crore
महत्त्वाच्या बातम्या
- TheFocusIndia चे देदीप्यमान यश! अल्पावधीतच १ कोटी पेज व्ह्यूजची भरारी ; वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल शतश; आभार
- ठाकरे सरकारला पुन्हा फटकार : Door to Door Vaccination हे सर्व पब्लिसिटीसाठी सुरु होतं का? हायकोर्टाचा संताप
- पुण्याच्या सोळा वर्षीय मुलाने टिपले चंद्राचे सुंदर आणि सुस्पष्ट छायाचित्र
- अजित पवारांसह दिग्गजांना क्लिन चिटवर संशय, शिखर बँक घोटाळा प्रकरणाती तत्काळ सुनावणीस मनाईची अण्णा हजारेंची मागणी मान्य
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी युट्यूब चॅनलमधून महिन्याला कमावतात चार लाख रुपये