• Download App
    ऑलम्पिकपूर्वी भारतासाठी GOOD NEWS : नेमबाजी विश्वचषक स्पर्धा ISSF World Cup -कोल्हापूरच्या राही सरनौबतचा 'सुवर्ण'वेध। GOOD NEWS for India ahead of Olympics: Shooting World Cup ISSF World Cup - Kolhapur's Rahi Sarnaubat's 'Golden' Watch

    ऑलम्पिकपूर्वी भारतासाठी GOOD NEWS : नेमबाजी विश्वचषक स्पर्धा ISSF World Cup -कोल्हापूरच्या राही सरनौबतचा ‘सुवर्ण’वेध

    ऑलम्पिकपूर्वी भारतासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. क्रोएशिया येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत राही सरनोबतने महिलांच्या 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूलमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले.


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ऑलम्पिकपूर्वी भारतासाठी Good News आहे .टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली कोल्हापूरची नेमबाज राही सरनौबतने आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत राही सरनौबतने महिलांच्या २५ मी. पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. याच प्रकारात भारताची युवा नेमबाज मनू भाकेरला सातव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. GOOD NEWS for India ahead of Olympics: Shooting World Cup ISSF World Cup – Kolhapur’s Rahi Sarnaubat’s ‘Golden’ Watch



    राहीच्या खेळामुळे भारताने या स्पर्धेत पहिल्या सुवर्णपदकाची नोंद केली आहे. भारताच्या नावावर या स्पर्धेत याआधी १ रौप्य तर दोन कांस्यपदकं जमा आहेत. ३० वर्षीय राहीने पात्रता फेरीत ५९१ गुणांसह दुसरे स्थान पटकावल्यानंतर अंतिम फेरीत ३९ गुण मिळवत पहिला क्रमांक प्राप्त केला. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मालिकेत राहीने अप्रतिम कामगिरी करत गुणांची लयलूट केली. फ्रान्सच्या माथिल्डे लॅमोल हिने अंतिम फेरीत ३१ गुण मिळवत रौप्यपदक जिंकले.

    सुवर्णपदक निश्चित केल्यानंतर अखेरच्या फेऱ्यांमध्ये मी माझ्या तांत्रिक खेळावर अधिक भर दिला. अनेक नवीन गोष्टी प्रयोगात आणल्या. या स्पर्धेत पदक मिळवणे माझे ध्येय नव्हते तर टोक्यो ऑलिम्पिकआधी नवनवीन गोष्टींची उजळणी करणे महत्त्वाचे होते. या सुवर्णपदकामुळे माझी वाटचाल योग्य दिशेने होत आहे, हे स्पष्ट झाले. आता ऑलिम्पिकनंतरही या नवनवीन गोष्टींचा अवलंब करण्याचा माझा प्रयत्न असेल.

    GOOD NEWS for India ahead of Olympics: Shooting World Cup ISSF World Cup – Kolhapur’s Rahi Sarnaubat’s ‘Golden’ Watch

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!