विशेष प्रतिनिधी
सिमला : हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर सुरू आहे. सकाळी 9.00 वाजेपर्यंतच्या निकालातील कलाचा आढावा घेतला, तर काँग्रेस 34 आणि भाजप 33 जागांवर आघाडीवर असल्याचे कल सांगतात. आम आदमी पार्टीला हिमाचलमध्ये भोपळाही फोडता आला नसल्याचे कलांमधून दिसते. Good news for Congress from Himachal
पण हिमाचल प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल काहीही लागोत, काँग्रेससाठी मात्र ती आनंदाची बातमी असेल. काँग्रेसची काठावरच्या बहुमताची सत्ता आली किंवा काठावरच्या बहुमताचीच सत्ता हातातून निसटली तरी काँग्रेससाठी मात्र एक बाब पक्की धरायला हरकत नाही, ती म्हणजे काँग्रेस पक्ष संघटनेच्या बळावर निवडणुकीच्या मैदानात बाजी मारू शकतो… मग प्रचारात राहुल गांधी आणि गांधी परिवार असो अथवा नसो…!!
एक्झिट पोल : गुजरात मध्ये भाजप स्वतःचेच तोडणार रेकॉर्ड; आपचा फुटणार फुगा
कारण काँग्रेस पक्षाने हिमाचलच्या प्रचारात सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या प्रतिमा जरूर वापरल्या. पण प्रियांका गांधींचा अपवाद वगळला तर बाकी कोणी हिमाचलमध्ये फिरकले देखील नाही. तरी देखील हिमाचलमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवण्याइतपत अथवा सत्तेच्या खूपच जवळ जाण्याइतपत निवडणुकीत यश मिळत असेल, तर ते संघटनेच्या बळावर आहे हे मानावे लागेल.
हिमाचलमध्ये आलटून पालटून सत्ता पालट हे गणित जरी फिट बसले असले तरी ते गणित बसवण्यामागे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या संघटनांचा फार मोठा हात आहे हे निश्चित म्हणावे लागेल. अन्यथा एकीकडे मोदींसारखा प्रचंड प्रभावी नेता आणि दुसरीकडे काँग्रेसकडे गांधी परिवार असूनही तो प्रचारात नसणे आणि केवळ प्रतिमेचा वापर होणे ही तशी लढाई विषम होती. पण तरी देखील काँग्रेस पक्ष संघटनेच्या बळावर जर सत्तेच्या सोपान पर्यंत येऊन पोहोचत असेल तर हे पक्ष नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी क्रेडिटेबल बाब आहे हे मान्य करावे लागेल.
Good news for Congress from Himachal
महत्वाच्या बातम्या