• Download App
    केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, महागाई भत्यात तीन टक्यांनी वाढ|Good news for central government employees, three per cent increase in inflation allowance

    केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, महागाई भत्यात तीन टक्यांनी वाढ

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी खुशखबर आहे. जुलैपासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलत (डीआर) मध्ये तीन टक्यांनी वाढ करण्यात आली आहे.Good news for central government employees, three per cent increase in inflation allowance

    सप्टेंबरमध्ये डीए आणि वाढलेला महागाई भत्त्याचा लाभ सप्टेंबरपासून होण्याची शक्यता आहे. हा अहवाल अखिल भारतीय ग्राहक किंमत निदेर्शांक (एआयसीपीआय) च्या आकडेवारीवर आधारित आहे. जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा तपशील असलेला एआयसीपीआय अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला असून जुलैपासून त्यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे.



    केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना सध्या सातव्या वेतन आयोगांतर्गत १७ टक्के महागाई भत्ता मिळतो. महागाईचा सामना करण्यास मदत करण्यासाठी सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना देण्यात आलेल्या पगाराचा एक भाग म्हणजे महागाई भत्ता (डी.ए.).सप्टेंबरमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा केवळ महागाई भत्ता वाढणार नाही तर सरकार अन्य भत्तेही वाढवण्याच्या तयारीत आहे. यात ट्रॅव्हल अलाऊन्स आणि सिटी अलाऊन्सचा समावेश आहे.

    अहवालानुसार ७ व्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या १७ टक्के महागाई भत्ता मिळतो. शेवटच्या तीन वेळच्या महागाई भत्त्यांची एकत्र बेरीज केल्यानंतर ती २८ टक्के होणार आहे. यामध्ये जानेवारी २०२० मध्ये महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली, त्यानंतर दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच जुलै २०२० मध्ये निवृत्तीसाठी भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीमध्येही मोठी वाढ अपेक्षित आहे.

    Good news for central government employees, three per cent increase in inflation allowance

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले