• Download App
    केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ, उज्ज्वला योजना एलपीजी सिलिंडर अनुदानात वर्षभर वाढ|Good news for central employees, 4 percent increase in dearness allowance, increase in Ujjwala Yojana LPG cylinder subsidy for the year

    केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ, उज्ज्वला योजना एलपीजी सिलिंडर अनुदानात वर्षभर वाढ

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी महागाई भत्ता (DA) आणि निवृत्त निवृत्तिवेतनधारकांसाठी महागाई दिलासा (DR) 4% ने वाढवण्यात आले आहे. शुक्रवारी (24 मार्च) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे. याशिवाय उज्ज्वला योजना आणि कच्च्या जूटच्या एमएसपीवरही मोठी घोषणा करण्यात आली.Good news for central employees, 4 percent increase in dearness allowance, increase in Ujjwala Yojana LPG cylinder subsidy for the year

    बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित मंजूर फॉर्म्युल्यानुसार करण्यात आली आहे. वाढलेले दर 01 जानेवारी 2023 पासून लागू होतील. यासोबतच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही थकबाकी मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले.



    47.58 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 69.76 लाख सेवानिवृत्त निवृत्तिवेतनधारकांना महागाई भत्त्यात वाढीचा फायदा होईल, परंतु यामुळे सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी 12,815.60 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल.

    सरकारी तिजोरीवर किती भार?

    कर्मचारी – जानेवारी-2023 ते फेब्रुवारी-2024
    सरकारी कर्मचारी- 7646.80
    निवृत्तिवेतनधारक – 7304.72
    एकूण खर्च – 14951.52
    स्रोत :- PIB, रक्कम कोटी रुपयांत

    एलपीजी सबसिडी वाढवली

    बैठकीत मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत एलपीजी सबसिडी 1 वर्षासाठी वाढवण्यासही मंजुरी दिली. योजनेअंतर्गत, दरवर्षी 14.2 किलो गॅसच्या 12 सिलिंडरवर प्रति सिलिंडर ₹ 200ची सबसिडी दिली जाते. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकारच्या या पावलामुळे सर्वसामान्यांना जागतिक तणावामुळे गॅसच्या वाढत्या किमतींपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

    सरकारी आकडेवारीनुसार 1 मार्च 2023 पर्यंत एकूण 9.59 कोटी लोकांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळत आहे. 1 वर्षासाठी अनुदान वाढवून, सरकारला FY2023 मध्ये 6,100 कोटी रुपये आणि FY2024 मध्ये 7,680 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागेल. PMUY ग्राहकांचा सरासरी LPG वापर 2019-20 मध्ये 3.01 रिफिलवरून 2021-22 मध्ये 3.68 रिफिलपर्यंत वाढला आहे.

    Good news for central employees, 4 percent increase in dearness allowance, increase in Ujjwala Yojana LPG cylinder subsidy for the year

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार