• Download App
    शुभ वर्तमान , कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरतेय आयुष ६४ औषध|Good news, AYUSH 64 drugs are effective in the treatment of corona

    शुभ वर्तमान , कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरतेय आयुष ६४ औषध

    कोरोनाशी लढणाऱ्या कोट्यवधी भारतीयांशी शुभ वर्तमान आहे. आयुष ६४ नावाचे औषध कोरानोच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याची माहिती आयुष मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.Good news, AYUSH 64 drugs are effective in the treatment of corona


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाशी लढणाऱ्या कोट्यवधी भारतीयांशी शुभ वर्तमान आहे. आयुष ६४ नावाचे औषध कोरानोच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याची माहिती आयुष मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

    आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आयुष 64 नावाचे औषध कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम पातळीवरील रुग्णांच्या उपचारांसाठी प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे. देशात कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीत प्रख्यात संस्थांच्या शास्त्रज्ञांना या शोधाच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला आहे.



    आयुषचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, आयुष ६४ चे परिणाम खूपच उत्साहवर्धक आहे आणि जगातील नामांकित वैद्यकीय जर्नल्समध्ये लवकरच त्याच्या चाचण्यांचे निकाल जाहीर केले जातील.

    आयुष 64 हे एक हर्बल औषध आहे आणि आयुर्वेदिक विज्ञानातील केंद्रीय संशोधन मंडळाने त्याचा शोध लावला आहे. कोरोना संसर्गाच्या सौम्य आणि मध्यम पातळीवर उपचार करण्यासाठी ते प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

    आयुष 64 मध्ये विविध झाडांच्या सालीपासून वैज्ञानिकदृष्ट्या विकसित, सुरक्षित आणि प्रभावी आयुर्वेद तयार कैले गेले आहे. हे औषध आयुर्वेद आणि योग आधारित नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलने मंजूर केले आहे.

    पुण्यातील साथरोग प्रतिबंधक विभागाचे संचालक डॉ. अरविंद चोपडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, मुंबई आणि वर्धा या तीन केंद्रांवर ही चाचणी घेण्यात आली. प्रत्येक ठिकाणी ७० जण सहभागी झाले होते.

    त्यांच्यावर केलेल्या प्रयोगात कोरानाची सौम्य लक्षणे असताना त्यांना चांगला आराम पडला. आयुष ६४ च्या उपयोगाने थकवा, चिंता, ताणतणाव, भूक, सामान्य आनंद आणि झोपेवरदेखील त्याचे अनेक महत्त्वपूर्ण फायदे दिसून आले.

    डॉ. चोपडा यांनी असा निष्कर्ष काढला की या नियंत्रित औषधाच्या चाचणी अभ्यासानुसार आयुष ६४ चा वापर सौम्य ते मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर प्रभावीपणे आणि सुरक्षितपणे करता येईल.

    ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांवरही या औषधाचा वापर करून त्याचे निष्कर्ष पडताळून पाहण्यात येणार आहेत.डॉ. व्ही. एम. कटोच म्हणाले या अभ्यासाचा काळजीपूर्वक आढावा घेण्यात आला आहे. सौम्य ते मध्यम स्वरुपाच्या रुग्णांवर हे औषध वापरण्यासाठी लवकरच मान्यता देण्यात येणार आहे.

    Good news, AYUSH 64 drugs are effective in the treatment of corona

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची