अभिनेता संजय दत्तला संयुक्त अरब अमीरात म्हणजेच दुबईचा गोल्डन व्हिसा मिळाला. संजय दत्तनं त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट करत याची माहिती दिली. ज्यावर त्याची मुलगी त्रिशाला दत्तनंही कमेंट केली आहे.
बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्त याला UAE सरकारकडून Golden Visa मिळाला आहे. संजय दत्तने याबाबतची माहिती त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून दिली आहे. Golden Visa: Actor Sanjay Dutt’s ‘Ticket to Dubai’; UAE Golden Visa from Government; What is a Golden Visa?
विशेष प्रतिनिधी
मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तला संयुक्त अरब अमीरात म्हणजेच यूएईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. संजय दत्तनं बुधवार २६ मे रोजी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याची माहिती दिली. या व्हिसाव्दारे आता संजू बाबा १० वर्षं दुबईमध्ये राहू शकतो. सामान्यपणे हा व्हिसा पूर्वी उद्योगपती, गुंतवणूकदार आणि डॉक्टर किंवा तत्सम अन्य प्रोफेशन असलेल्या लोकांना देण्यात असे पण आता याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले असून त्यामुळे संजय दत्तला हा व्हिसा मिळाला आहे.
एवढंच नाही तर गोल्डन व्हिसा दिल्याबद्दल संजय दत्तने युएई सरकारचे आभारदेखील मानले आहेत. संजूबाबाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती देताना एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये GDRFA दुबईचे डायरेक्टर मेजर जनरल मोहम्मद अहमद अली मर्रि हे अभिनेता संजय दत्त यांना गोल्डन व्हिसा देत आहेत हे दिसून येतं आहे.
का महत्त्वाचा आहे गोल्डन व्हिसा?
गोल्डन व्हिसा लाँग टर्म रेसिडेंस व्हेंट आहे. हा व्हिसा मे 2019 मध्ये पंतप्रधान आणि दुबईच्या शासकांनी दिलेल्या अप्रुव्हलनंतर लागू करण्यात आला. 2020 मध्ये युएई सरकारने या व्हिसाची सुरूवात केली होती. या व्हिसाचा अवधी दहा वर्षांचा असतो. अनेक प्रतिभाशाली लोकांना गल्फ कंट्रीजमध्ये वसवणं हा या व्हिसाचा उद्देश आहे.
संजय दत्त नेहमीच त्याच्या कामानिमीत्त दुबईमध्ये ये-जा करीत असतो. यंदाची ईद देखील त्याने त्याच्या कुटूंबासह दुबाईमध्येच साजरी केली होती. गेल्या काही दिवसांपासून तो सध्या त्याच्या कुटूंबासह दुबईमध्येच राहत आहे. अशात संजय दत्त हा युएईचा गोल्डन व्हिसा मिळाला असल्यामुळे आता तो UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थायिक होऊन व्यवसाय देखील करू शकतो. भारतातल्या मेनस्ट्रीम कलाकारांपैकी अभिनेता संजय दत्त हा पहिला कलाकार आहे ज्याला युएईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर अभिनेता संजय दत्त युएईत नवे व्यवसाय सुरू करण्याच्या तयारी असल्याची चिन्हं दिसून येत आहेत.
काय आहे गोल्डन व्हिसा?
व्हिसा क्लासला मूळ रूपात एक स्थायी निवास सिस्टीमच्या रूपात तयार करण्यात आला होता. मात्र त्यानंतर रेजिडेन्सी आणि परदेशी प्रकरणाचे डायरेक्टर जनरलनी सांगितले की ही वास्तवाल लाँगटर्म १० वर्षीय व्हिसा आहे. गोल्डन व्हिसा एक प्रकारचे अनुदान आहे जे श्रीमंत व्यक्तींना दिले जाते ज्यामुळे देशात राहताना महत्त्वपूर्ण गुंतवणूक करू शकतील. या सिस्टीमचा वापर सरकार आपल्या टॅक्स आधाराला व्यापक बनवण्यासाठी करतात. यूएई गुंतवणूकदार आणि उद्योजकांसाठी विशेष रूपात बिझनेससाठी अनुकूल आणि टॅक्स फ्री वातावरण बनवण्यासाठी एक चांगले डेस्टिनेशन बनत आहे.
गोल्डन व्हिसा कोण मिळवू शकतं?
यूएईचा गोल्डन व्हिसाचा नुकताच करण्यात आलेल्या विस्तारानुसार आता पीएचडीधारकांना मिळेल ज्यांनी जगातील टॉप ५०० पैकी एका युनिर्व्हसिटीमधून शिक्षण घेतले आहे. नव्या कायद्यानुसार प्रमाणित डॉक्टरही व्हिसा मिळवू शकतात. कारण देश कोरोना व्हायरस महामारीपासून रेजिडेंट मेडिकलर्सची कमतरता भरून काढेल.
कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोग्रामिंग इलेक्ट्रॉनिक्स, अॅक्टिव्ह टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल्स, एआय आणि बिग डेटा क्षेत्रात विशेष पदवी मिळवणारे इंजीनियरर्सही यासाठी पात्र आहेत. हा व्हिसा माध्यमिक-विद्यालय अथवा युनिर्व्हसिटीच्या विद्यार्थ्यांना मिळू शकतो. ज्यांचा अॅकेडमिक रेकॉर्ड(९५ टक्क्याहून अधिक आहे). या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांसाठी लाँग टर्म व्हिसाही जारी केला जाऊ शकतो.
Golden Visa: Actor Sanjay Dutt’s ‘Ticket to Dubai’; UAE Golden Visa from Government; What is a Golden Visa?
महत्त्वाच्या बातम्या
- विषाणू उगमाच्या शोधावरून अमेरिका – चीन पुन्हा आमने सामने, एकमेकांवर दबावाचे राजकारण सुरु
- तिबेटच्या अध्यक्षपदी पेंपा सेरिंग याचा शपथविधी
- औषधाच्या विनाशुल्क आयातीला परवानगी, सीमाशुल्क माफ करण्याचेही न्यायालयाचे निर्देश
- विजय मल्ल्याचे नउ हजार कोटींचे कर्ज आता बॅंका वसूल करू शकणार
- म्यूकरमायकोसिसवरील औषधांसाठी मोदी सरसावले, जगभरातील दूतावासांचे प्रयत्न सुरु
- वीस लाख जणांना ‘यास’चा फटका, पंतप्रधान मोदी आज करणार पाहणी
- शेअर बाजारात आलेली जोरदार तेजी म्हणजे धोकादायक बुडबुडा, रिझर्व्ह बँकेचा इशारा