• Download App
    Golden job opportunity in SBI; Apply like this for the recruitment of 'these' posts

    SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ जागांवरील भरतीसाठी असा करा अर्ज

    प्रतिनिधी

    मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. भारतीय स्टेट बँकेत स्पेशलिस्ट केडर ऑफिसर पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. एसबीआयमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असणारे sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करू शकतात. ऑनलाईन भरती परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार आहे. SBI SCO भरती २०२२ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना २९ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध विभागांमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. Golden job opportunity in SBI; Apply like this for the recruitment of ‘these’ posts

    या जागांवर होणार भरती

    भारतीय स्टेट बँकेत डेप्युटी मॅनेजर पदासाठी १६ जागांवर भरती होणार आहे. तर सीनिअर एग्झिक्युटिव्ह १७ जागा, एग्झिक्यूटीव्ह २ जागा, एग्झिक्युटिव्ह २ जागा, सीनिअर स्पेशनल एग्झिक्युटीव्ह १ जागा, डेटा प्रोटेक्शन ऑफिसर १ जागा, असिस्टंट डेटा ऑफिसर १ जागा, सीनिअर क्रेडिट स्पेशालिस्ट १६ जागा आणि रिक्त जागांची संख्या ५४ इतकी असल्याचे सांगितले जात आहे.

    किती असणार अर्ज शुल्क

    जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी विभागासाठी उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित प्रवर्गातील उमेवादारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

    असा करा अर्ज

    • सर्वप्रथम sbi.co.in/web/careers वर भेट द्या.
    • होमपेजवर ‘RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS’ या लिंकवर क्लिक करा.
    • त्यानंतर Apply Online वर क्लिक करा. यामध्ये रजिस्ट्रेशन करा आणि अर्ज भरा.
    • आवश्यक कागदपत्र अपलोड करून फी जमा करा. सबमिट बटणावर क्लिक करा आणि तुमच्या कर्न्फरमेशनसाठी पावतीची प्रिंट आऊट घेऊन ठेवा.
    • कोणत्या पदासाठी किती असणार पगार
    • डेप्युटी मॅनेजर पदासाठी ६० लाख रुपये (वार्षिक पॅकेज)
    • सीनिअर एग्झिक्यूटिव्ह पदासाठी २४ लाख रुपये (वार्षिक पॅकेज)
    • एग्झिक्यूटिव्ह पदासाठी २० लाख रुपये (वार्षिक पॅकेज)
    • सीनिअर स्पेशल एग्झिक्यूटिव्ह पदासाठी २७ लाख रुपये (वार्षिक पॅकेज)

    Golden job opportunity in SBI; Apply like this for the recruitment of ‘these’ posts

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य