• Download App
    Actress Ranya Raos सोन्याची तस्करी प्रकरण : अभिनेत्री रान्या रावच्या वडिलांना

    Actress Ranya Raos : सोन्याची तस्करी प्रकरण : अभिनेत्री रान्या रावच्या वडिलांना पाठवण्यात आले सक्तिच्या रजेवर

    Actress Ranya Raos

    अभिनेत्रीचा रान्या राव हिन आरोप केला की, पोलिसांनी त्यांना १०-१५ वेळा मारहाण केली


    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : Actress Ranya Raos  सोने तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी कन्नड अभिनेत्री रान्या रावच्या वडिलांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. कर्नाटक राज्य पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे डीजीपी रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. भरती विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के.व्ही. शरत चंद्रा यांना कर्नाटक राज्य पोलिस गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड, बंगळुरूचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा समवर्ती कार्यभार तत्काळ देण्यात आला आहे.Actress Ranya Raos

    कन्नड अभिनेत्री आणि रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी रान्या राव ही सोने तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. शुक्रवारी आर्थिक गुन्हे न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिने शनिवारी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.



    रान्या राव हिने आरोप केला की महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी तिला मारहाण केली आणि काही रिकाम्या आणि आधीच लिहिलेल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. ६ मार्च रोजी बंगळुरू येथील डीआरआयच्या अतिरिक्त महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात रान्या हिने दावा केला की तिच्यावर खोटा खटला लादण्यात आला आहे. तिने पत्रात म्हटले आहे की दुबईहून परतल्यावर तिच्यावर १४ किलोपेक्षा जास्त सोने बाळगल्याचा खोटा आरोप करण्यात आला.

    Gold smuggling case Actress Ranya Raos father sent on special leave

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज