• Download App
    GOLD बातमी ! सोने होणार स्वस्त ; आयात शुल्क कमी ; वाणिज्य मंत्रालयाचा निर्णय; वाचा सविस्तर|GOLD NEWS! Gold will be cheaper; Lower import duties; Decision of the Ministry of Commerce; Read detailed

    GOLD बातमी ! सोने होणार स्वस्त ; आयात शुल्क कमी ; वाणिज्य मंत्रालयाचा निर्णय; वाचा सविस्तर

    • वाणिज्य मंत्रालयाने सोन्यावरील सीमा शुल्क फक्त 4 टक्के ठेवण्याची घोषणा केली आहे. परिणामी मार्केटमध्ये सोन्याला पुन्हा झळाळी मिळणार आहे.
    • आत्तापर्यंत सोन्यावर 7.5 टक्के आयात शुल्क आकारले जात होते. त्यामध्ये घट करून ते 4 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.
    • शुल्क आकारणी कमी केल्यास चोरट्या मार्गाने होणारी सोन्याची आयात कमी होईल आणि सरकारी तिजोरीत गंगाजळी वाढेल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :मुंबई :  Gold Import Duty सोन्याच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. सोन्यावरील आयात शुल्कामध्ये कपात करण्याचा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने सादर करण्यात आला होता त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.त्याचा परिणाम थेट सोन्यासंबंधीचे शेअर आणि ज्वेलरी शेअरवर दिसून आला.GOLD NEWS! Gold will be cheaper; Lower import duties; Decision of the Ministry of Commerce; Read detailed

    सध्या सोन्यावर 7.5 टक्के आयात शुल्क मोजावे लागते. सोबतच 2.5 टक्क्यांचा कृषी सेस (Agriculture Cess) वेगळा आकारला जातो. त्यामुळे सोन्यावर एकूण 10 टक्के आयात शुल्क मोजावे लागते.



    हे 10 टक्के आयात शुल्क वाचाविण्याच्या नादात सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात देशात सुरु आहे. देशात येणा-या एकूण सोन्यात तस्करीने येणारे सोने 25 टक्के इतके आहे.

    सर्वसामान्यांना काय ?

    देशात सोन्याच्या किंमतीत जी अचानक उसळी आली होती. ती स्थिर होण्याची चिन्हे दिसतील. आज पन्नाशीच्या आसपास असलेले सोनं काही अंशी तरी घसरेल.

    GOLD NEWS! Gold will be cheaper; Lower import duties; Decision of the Ministry of Commerce; Read detailed

    विशेष प्रतिनिधी

     

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले