विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भालाफेकीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याने खिलाडूपणाचे अनोखे दर्शन घडविले आहे. चक्क एका पाकिस्तानी खेळाडूच्या बचावासाठी नीरज पुढे आला.टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकले. भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर थ्रो केला.Gold medalist Neeraj Chopra’s sportsmanship came in support of Pakistani player
त्याचा दुसरा थ्रो 87.58 मीटर होता. नीरजने सांगितले की, त्याने घाईघाईत पहिला थ्रो केला. फायनल सुरू होणार होती आणि मला माझा भाला मिळत नव्हता. तेव्हाच मी माझा भाला पाकिस्तानी थ्रोअर अरशद नदीमच्या हातात पाहिला. मग मी त्याच्याकडून भाला घेतला आणि घाईघाईने थ्रो केला.
नीरजचा भाला नदीमच्या हातात असल्याच्या बातम्या समोर आल्यावर पाकिस्तानी खेळाडूने हे मुद्दाम केल्याचा आरोप करायला सुरूवात केली. मात्र, त्यांच्यावर नीरजने टीका केली आहे. अशरद नदीमचे समर्थन करताना नीरज म्हणाला, अरशद नदीमने कोणताही नियम मोडला नाही. त्याने जे काही केले ते नियमांमध्येच केले.
मी आपणा सर्वांना विनंती करतो की माझ्या वक्तव्याला आपला गलिच्छ अजेंडा पुढे नेण्याचे माध्यम बनवू नका. खेळ आपल्या सर्वांना एकत्र राहण्यास शिकवतो आणि टिप्पणी करण्यापूर्वी खेळाचे नियम जाणून घेणे महत्वाचे आहे.
नीरज आणि अशरफ एकमेंकांचे प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, ते एकमेकांचा आदर करतात. 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही दोघे एकमेकांसमोर आले होते. तेव्हा नीरजने सुवर्ण आणि अशरफने कांस्य जिंकले होते. अरशद नदीमने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 5 वे स्थान मिळवले.
Gold medalist Neeraj Chopra’s sportsmanship came in support of Pakistani player
महत्त्वाच्या बातम्या
- हार्दिक पंड्याचे ५ कोटी किमतीचे दुर्मिळ पाटेक फिलिप एमराल्ड कट घड्याळ दिसले मनगटी
- योगी आदित्यनाथ सरकार देणार कुस्तीला बळ, २०३१ च्या ऑलिम्पिकपर्यंत करणार १७० कोटी रुपयांची गुंतवणूक
- दिरंगाईमुळे प्रकल्पाचा खर्च वाढला तिप्पट आणि पंतप्रधान मोदी संतापले, दोषी अधिकारी एजन्सीची यादी करण्याचे दिले आदेश
- डिझेलवरील वाहनांचे उत्पादन बंद करा, दुसरे पर्याय शोधा, नितीन गडकरी यांचे कंपन्यांना आवाहन