• Download App
    सुरतच्या सराफाने घडवली मोदींची सोन्याची मूर्ती, तीही 156 ग्रॅमची!! Gold idol of Modi made by Sarafa of Surat

    सुरतच्या सराफाने घडवली मोदींची सोन्याची मूर्ती, तीही 156 ग्रॅमची!!

    वृत्तसंस्था

    सुरत : आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी अनेक जण वेगवेगळ्या अनोख्या गोष्टी करत असतात. अशीच एक गोष्ट गुजरात मधल्या भाजपच्या प्रचंड विजयानंतर घडली आहे. सुरतचे सराफ बसंत बोहरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चक्क सोन्याची मूर्ती घडवली आहे. Gold idol of Modi made by Sarafa of Surat

    गुजरात मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला 156 जागांवर ऐतिहासिक विजय मिळाला. या विजयाचे प्रतीक म्हणून बसंत बोहरा यांनी मोदींची 156 ग्रॅमची 18 कॅरेट सोन्याची मूर्ती घडवली आहे.

    साडेतीन इंच व्यासाची आणि चार इंच उंचीची ही मूर्ती हुबेहूब मोदींच्या चेहऱ्यानुसार घडवली आहे. मोदींचा नुसता चष्माच घडवायला तीन दिवस लागले. या मूर्तीसाठी 10 लाख 56 हजार रुपये खर्च आला असून मूर्तीची किंमत 11 लाख रुपये ठेवल्याचे बसंत बोहरा यांनी सांगितले आहे.

    Gold idol of Modi made by Sarafa of Surat

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    WhatsApp DP Scam : WhatsAppवर डीपी बदलून 7.8 कोटींची फसवणूक! माजी पंतप्रधानांच्या मुलालाही सायबर ठगांनी गंडवले; 4 कोटींची रक्कम गोठवली

    Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक- झारखंडमध्ये क्रॉस व्होटिंग, काँग्रेस उमेदवाराचा पराभव, भाजप-समर्थित विजयी, 12 राज्यांमधील 26 जागांपैकी 19 जागा एनडीएला

    वाराणसीत राहुल गांधींच्या फोटोची परशुराम रुपात पूजा; एका हातात परशु, दुसऱ्या हातात घटना!!