वृत्तसंस्था
सुरत : आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी अनेक जण वेगवेगळ्या अनोख्या गोष्टी करत असतात. अशीच एक गोष्ट गुजरात मधल्या भाजपच्या प्रचंड विजयानंतर घडली आहे. सुरतचे सराफ बसंत बोहरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चक्क सोन्याची मूर्ती घडवली आहे. Gold idol of Modi made by Sarafa of Surat
गुजरात मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला 156 जागांवर ऐतिहासिक विजय मिळाला. या विजयाचे प्रतीक म्हणून बसंत बोहरा यांनी मोदींची 156 ग्रॅमची 18 कॅरेट सोन्याची मूर्ती घडवली आहे.
साडेतीन इंच व्यासाची आणि चार इंच उंचीची ही मूर्ती हुबेहूब मोदींच्या चेहऱ्यानुसार घडवली आहे. मोदींचा नुसता चष्माच घडवायला तीन दिवस लागले. या मूर्तीसाठी 10 लाख 56 हजार रुपये खर्च आला असून मूर्तीची किंमत 11 लाख रुपये ठेवल्याचे बसंत बोहरा यांनी सांगितले आहे.
Gold idol of Modi made by Sarafa of Surat
महत्वाच्या बातम्या