• Download App
    वाराणसीच्या धर्तीवर नाशकातही गोदा आरती; अमृत काळात लोकसहभागातून भव्य उपक्रम Goda Aarti also in Nashak on the lines of Varanasi

    वाराणसीच्या धर्तीवर नाशकातही गोदा आरती; अमृत काळात लोकसहभागातून भव्य उपक्रम

    • सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय

    प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरू आहे. या पर्वात वाराणसीच्या धर्तीवर नाशिक येथे भव्य दिव्य स्वरूपात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला असून यासंदर्भात आज त्यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. समिती गठीत करुन विस्तृत आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. Goda Aarti also in Nashak on the lines of Varanasi

    या बैठकीला आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी डी. गंगाधारन, यांच्यासह नाशिक महापालिकेचे उपायुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, विविध विभागांचे अधिकारी, पुरोहित संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

    यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, हा उपक्रम अतिशय भक्तीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पूर्ण करावयाचा आहे त्यामुळे यामध्ये लोकसहभाग वाढवून सर्वसामान्य जनतेकडून सूचना मागविण्यात याव्यात. आरती ज्या ठिकाणी प्रारंभ करायची आहे तो परिसर तसेच नदी स्वच्छ करण्यासाठी कार्यवाही सुरू करावी. स्वच्छता केंद्र, आकर्षक रोषणाई, पुरेशी वाहन पार्किंग व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, भाविकांना उभे राहण्याची किंवा बसण्याची प्रशस्त सोय तसेच स्थानिक छोटे व्यावसायिक आणि रहिवाशी यांना विश्वासात घेऊन शिस्तबद्ध रित्या नियोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

    बैठकीत पुरोहित संघाने महत्वपूर्ण सूचना मांडल्या. त्याची दखल सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली. आ. देवयानी फरांदे, आ. सीमाताई हिरे, आ. राहुल ढिकले यांनीसुद्धा या चर्चेत महत्वाच्या सूचना मांडल्या.

    Goda Aarti also in Nashak on the lines of Varanasi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची