प्रतिनिधी
मुंबई : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड परिसरातील जेपी इन्फ्रा हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांनी कुर्बानीसाठी बकरे आणल्याबद्दल रहिवाशांच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी सोसायटीत बकरीची कुर्बानी अजिबात देता येणार नाही, असे सांगून दणका दिल्याने संबंधित व्यक्ती बकऱ्यांना घेऊन बाहेर गेला. पोलिसांनी 11 जणांविरुद्ध आयपीसी कलम 143, 147, 149, 354, 323, 341, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला. Goats brought to society on Mira Road in Mumbai
मीरा रोडमधील जेपी इन्फ्रा सोसायटीत बकरी ईदला (Bakari Eid) कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरुन वाद झाल्याची घटना घडली आहे. बकरी ईदनिमित्त दोन बकरे आणण्यात आले होते. हा प्रकार लोकांना कळताच लोकांनी एकच गोंधळ घातला. लोकांनी सोसायटीच्या आवारात हनुमान चालिसा पठण केलं. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेपी इन्फ्रा या उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. अखेर पोलिसांनी वाद मिटवला. पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सोसायटीत पोलीस बंदोबस्त तैनात
सोसायटीत राहणारे मोहसीन शेख यांनी बकरी ईदनिमित्त सोसायटीत दोन बकरे आणले होते. ही बाब सोसायटीत समजल्यानंतर सोसायटीतील काही लोकांनी सोसायटीत एकत्र येत निषेध केला. बकऱ्यांना बाहेर काढा अशी सोसायटीतील लोकांनी मागणी सुरू केली काल रात्रभर हा गदारोळ सुरू होता. या गदारोळात लोकांनी हनुमान चालिसा पठण करून जय श्री रामच्या घोषणाही दिल्या. काशिमीरा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला. डीसीपी जयंत बजबळे यांनी लोकांची समजूत काढली आणि राग शांत केला. यात सोसायटीतील लोक आणि पोलिसांमध्ये थोडी बाचाबाची ही झाली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला सोसायटीत बकऱ्यांची कुर्बानी देण्यात चालणार नाही, असे स्पष्ट सुनावले.
बकरी ठेवण्यासाठी जागा नाही
बकरी घेऊन आलेल्या मोहसीनच्या म्हणण्यानुसार, या सोसायटीत 200 ते 250 मुस्लिम कुटुंब राहतात. दरवर्षी बिल्डर आम्हाला बकरी ठेवण्यासाठी जागा देतो, पण यावेळी बिल्डरने सांगितले की आमच्याकडे जागा नाही, यासाठी तुमच्या सोसायटीशी बोला. मोहसीनच्या म्हणण्यानुसार त्यांनी सोसायटीकडे बकरी ठेवण्यासाठी जागा मागितली होती, पण सोसायटीने जागा दिली नाही. म्हणून मोहसीनने मंगळवारी पहाटे 2.00 बकऱ्या आणल्या. आम्ही सोसायटीत कधीच कुर्बानी देत नाही, आम्ही नेहमी कत्तलखान्यात किंवा बकऱ्यांच्या दुकानात बकऱ्याची कुर्बानी देतो, असा दावा मोहसिनने केला. तसेच जमलेल्या जमावाने गैरवर्तणूक आणि शिवीगाळ केल्याचा आरोप मोहसीनने केला. पण सोसायटीथले लोक ठाम राहिले. सोसायटीत बकरी आणू शकत नाही. कुर्बानी देऊ शकत नाही, असे सांगितले.
पोलिसांनीही सोसायटीत बकऱ्यांची कुर्बानी चालणार नाही असे स्पष्ट सुनावल्याने मोहसीन त्या बकऱ्यांना घेऊन बाहेर गेला.
Goats brought to society on Mira Road in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल यांच्या सरकारी बंगल्याचे कॅग ऑडिट करणार; नूतनीकरणासाठी 53 कोटी रुपये खर्च, एलजींनी गृह मंत्रालयाला केली होती शिफारस
- आदिपुरुषवर अलाहाबाद हायकोर्ट म्हणाले- दरवेळी हिंदूंच्या सहिष्णुतेची परीक्षा कशाला? नशीब, त्यांनी कायदा मोडला नाही!
- पुतीनविरोधात बंड होणार हे अमेरिकेला माहिती होते, रिपोर्टमध्ये दावा- त्यांनी हे नाटोपासूनही लपवले
- काश्मीरमध्ये १५ दिवसांत ११ पाकिस्तानी दहशतवादी ठार; ५५ किलो ड्रग्ज अन् मोठ्याप्रमाणात शस्त्रंही जप्त!