• Download App
    गोव्यात प्रत्यक्षात भाजपला बहुमत; पण संजय राऊत चिदंबरमना म्हणाले, तुम्हाला सहकार्य करू!!Goa Shivsena - Congress: BJP actually has majority in Goa

    Goa Shivsena – Congress : गोव्यात प्रत्यक्षात भाजपला बहुमत; पण संजय राऊत चिदंबरमना म्हणाले, तुम्हाला सहकार्य करू!!

    प्रतिनिधी

    पणजी : गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विजयासह भाजपला बहुमत मिळाले आहे पण शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र काँग्रेसचे नेते वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांना शिवसेनेच्या सहकार्याचे आश्वासन दिले आहे. गोव्यातल्या निकालाबाबत संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया व्यक्त करताना पी. चिदंबरम यांचा फोन आल्याचे सांगितले. त्या वेळी शिवसेना काँग्रेसला सहकार्य करेल, असे आश्वासन दिल्याचे संजय राऊत म्हणाले. Goa Shivsena – Congress: BJP actually has majority in Goa

    – संजय राऊत म्हणाले होते की…

    खिचडी बहोत जगह बन सकती है. मतमोजणी पूर्ण झाली अजून, लोकांना नोटाला का मतं द्यावीशी वाटतायत हा प्रश्न सर्वच राजकीय लोकांनी करण्याची गरज आहे. आम्ही पूर्ण काम केलं होतं. उत्तर प्रदेश, गोव्यात आम्ही प्रयत्न केले. आदित्य ठाकरे देखील आले होते. ही सुरुवात आहे. आधी धडपड करावी लागते आणि ती आम्ही केली. आता आम्ही थांबणार नाही. आता लोकसभा लढू. सुरुवात केली आहे. प्रमोद सावंत यांच्याविषयी नाराजी होती. आम्ही आदित्य ठाकरेंची सभा देखील तिकडे घेतली होती. मात्र, आता अजून चित्र स्पष्ट व्हायला २ वाजतील. बघू काय होते. गोव्यात मागील सारखी परिस्थिती नाही ओढवणार, पी. चिदंबरम यांचा मला फोन आला होता. माझं बोलणं झालं. ते गोव्यात आहेत. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू, असे राऊत यावेळी म्हणाले.

    महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याचा निर्धार करणाऱ्या शिवसेनेचा पहिल्या दीड तासाच्या मतमोजणीत शिवसेनेच्या उमेदवारांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर फ्लॉप शो कायम असल्याची चर्चा आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभाही घेतली होती. सकाळी 10 वाजेपर्यंत शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचे दिसून आले.

    – राष्ट्रवादीचा फ्लॉप शो

    महाराष्ट्राबाहेर पक्ष विस्तार करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत, असे संजय राऊत म्हणाले. त्या दृष्टीने शिवसेनेने गोव्यात आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उभे केले होते. शिवसेनेने काँग्रेससोबत युती करण्यासाठी बोलणीदेखील केली होती. मात्र, काँग्रेसने नकार दिल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. तर, उत्तर प्रदेशात शिवसेनेने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. गोव्यात शिवसेनेने 10 उमेदवार उभे केले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने 13 उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे.

    Goa Shivsena – Congress: BJP actually has majority in Goa

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली