• Download App
    गोवा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी विरोधासाठी आगीत ओतले तेल, मात्र स्थानिकांनी नौदलासोबत उत्साहाने केले झेंडावंदन|Goa NCP state president fires oil for protests, but locals enthusiastically salute the flag with the navy

    झेंडावंदन न करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोवा प्रदेशाध्यक्षांनी भडकावले; मात्र स्थानिकांनी नौदलासोबत उत्साहाने फडकावला तिरंगा!

    विशेष प्रतिनिधी

    पणजी : झेंडावंदनास विरोध करण्यासाठी गोवा राष्ट्र्वादी कॉँग्रेसच्य प्रदेशाध्यक्षांनी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक रहिवाशांनी विरोध मोडून काढत नौदलासोबत उत्साहाने झेंडावंदन केले. स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने दक्षिण गोव्यातील साओ जॅसिंटो बेटावर राष्ट्रध्वज फडकाविण्याचा सोहळा नौदलाने रद्द केला होता. मात्र, त्यानंतर ग्रामस्तांनीच नौदलाला आग्रहाने निमंत्रण देऊन झेंडावंदनाचा सोहळा केला.Goa NCP state president fires oil for protests, but locals enthusiastically salute the flag with the navy

    दक्षिण गोव्यातील साओ जॅसिंटो बेटावरील रहिवाशांना झेंडावंदनाविरुध्द भडकाविण्याच प्रयत्न काही राजकारण्यांनी केला होता. गोवा राष्ट्र्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जोस फिलीप डिसोझा यांनी यामध्ये पुढाकार घेतला होता. बेटावर झेंडावंदन करून नौदलाला ताबा घ्यायचा आहे असे सांगून त्यांनी ग्रामस्थांना भडकाविले होते. बेटावरील रहिवाशांना जमा करून डिसोझा म्हणाले होते की बेटाचा ताबा घेण्याचे हे पहिले पाऊल आहे. त्यामुळे झेंडावंदनाला विरोध करून आपण आत्ताच हे रोखायला पाहिजे.



    मात्र, नौदलाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगितले. त्यामुळे ग्रामस्थ आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सौहार्दाने एकत्रितपणे कार्यक्रम आयोजित करून झेंडावंदन केले.
    केंद्र किंवा राज्य सरकारने या बेटावर कोणतेही उपक्रम राबवायचे नाहीत, अशी मागणी येथील राजकारण्यांनी केली होती. त्यामुळे नौदलाने झेंडावंदनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा विचार केला होता. मात्र, स्थानिक रहिवाशांनी राजकारण्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.

    कॅ. विरिअटो फर्नांडिस म्हणाले स्थानिक राजकारण्यांनी तणाव निर्माण करण्याच प्रयत्न केला. मात्र, आता तणाव निवळला आहे. माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल अरुण प्रकाश यांनी या प्रकाराला पेल्यातील वादळ असे म्हटले आहे.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले होते की, झेंडावंदन रद्द करावे लागणे हे दुदैर्वी आणि लज्जास्पद आहे.

    सेंट जॅकिंटो बेटावरील काही व्यक्तींनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय नौदलाकडून राष्ट्रीय ध्वज फडकवण्यावर आक्षेप घेतला आहे. मी याचा निषेध करतो आणि सांगू इच्छितो की माझे सरकार अशा कृत्यांना सहन करणार नाही.

    भारतीय नौदलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा भाग म्हणून, संरक्षण मंत्रालयाने 13 ते 15 आॅगस्ट, 2021 दरम्यान देशभरातील बेटांवर राष्ट्रीय ध्वज फडकवण्याची योजना आखली आहे.

    Goa NCP state president fires oil for protests, but locals enthusiastically salute the flag with the navy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!