विशेष प्रतिनिधी
पणजी : भाजपाने गोव्याचा विकास केला. गांधी परिवारासाठी गोवा फक्त सुट्टी एन्जॉय करण्याचं ठिकाण आहे. भाजपासाठी गोवा म्हणजे गोल्डन गोवा. पण काँग्रेससाठी गोवा म्हणजे गांधी परिवाराचा गोवा, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.Goa is the only place for Gandhi family to enjoy their holidays, says Union Home Minister Amit Shah
अमित शाह म्हणाले की माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोव्याच्या विकासासाठी काहीही केलं नाही. भाजपाने मात्र दिलेला शब्द पाळला. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कामाचं कौतुकही केलं. ते म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री सावंतजी, मनोहर पर्रिकरांच्या गोल्डन गोव्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खूप कष्ट घेत आहेत.
गोव्यातला लसीकरणाचा वेग देशात सर्वाधिक आहे. प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात सर्वाधिक वेगाने १०० टक्के लसीकरणाचं लक्ष गाठण्यात गोवा यशस्वी ठरला आहे. गोव्यामध्ये २०२५ पूर्वी अनेक स्टार्टअप्स असतील.भाजपा ३००० कोटींचं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारेल.
गोव्याच्या विकासासाठी भाजपच राजकीय स्थैर्य देऊ शकतो असे सांगून अमित शाह म्हणाले, राज्यातील नागरिकांपुढे भाजपचा सुवर्ण गोव्याचा विचार किंवा काँग्रेसचा गांधी परिवाराचा गोवा असे निवडीचे पर्याय आहेत. गांधी कुटुंबीयांना गोव्यात सुटीला येण्याची सवय आहे. त्यामुळे सुटीसाठी त्यांना पर्यटनस्थळ हवे आहे. मात्र भाजपसाठी गोवा विकासाचे माध्यम आहे. त्यामुळे जनतेने निवड करायची आहे असे त्यांनी नमूद केले.
गोव्याबाहेरील काही पक्ष रिंगणात उतरले आहेत. मात्र ते विकास करू शकणार नाहीत. काही पक्ष निवडणुकीपूर्वी मोठ्या घोषणा करतात मात्र निवडून येणार नसल्याची खात्री असल्याने आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रश्नच नाही असा टोला शहा यांनी लगावला.
Goa is the only place for Gandhi family to enjoy their holidays, says Union Home Minister Amit Shah
महत्त्वाच्या बातम्या
- राहूल तर फेक गांधी, महात्मा गांधींचे स्वप्न भाजप पूर्ण करतोय, गिरीराज सिंह यांचा हल्लाबोल
- कदाचित २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात, कांदा-बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदींना पंतप्रधान केले नाही, कपिल पाटील यांचा दावा
- बालकुमार साहित्य संस्थेतर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी बालसाहित्य पुरस्कारांचे वितरण
- वाईन आणि दारूमध्ये खूप मोठा फरक, बाळासाहेब थोरातांनी सांगितले शेतकऱ्यांचे फायदे