• Download App
    गोव्यात चित्रपट, मालिकांच्या शूटिंगवर बंदी; हिंदी, मराठी मालिका सापडल्या संकटात|Goa bans shooting of films, series;Hindi, Marathi series found in crisis

    गोव्यात चित्रपट, मालिकांच्या शूटिंगवर बंदी; हिंदी, मराठी मालिका सापडल्या संकटात

    वृत्तसंस्था

    पणजी : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे गोव्यात चित्रपट, मालिकांच्या शूटिंगवर बंदी घातली आहे. त्यामुळे शूटिंगसाठी गोव्यात गेलेल्या हिंदी, मराठी मालिका संकटात सापडल्या आहेत.Goa bans shooting of films, series;Hindi, Marathi series found in crisis

    महाराष्ट्रात चित्रपट, मालिकांच्या शूटिंगवर बंदी आहे. त्यामुळे गोवा, दमण, सिलवासा, जयपूर, बेळगाव आदी ठिकाणी शूटिंग सुरू आहे. झी मराठीवरील ‘पाहिले न मी तुला’ आणि ‘अगंबाई सूनबाई’, स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’,



    ‘रंग माझा वेगळा’, कलर्सवरील ‘सूर नवा, ध्यास नवा’ या मालिकांचे शूटिंग गोव्यात सुरू होते. मात्र, कोरोना कहर वाढल्याने शूटिंगवर निर्बंध घातले आहेत. ‘पाहिले न मी तुला’ आणि ‘अगंबाई सूनबाई’ची टीम गोक्यातून मुंबईत परतली असून या मालिकांची पुढील शूटिंग दमण आणि सिल्वासाला होणार आहे.

    हिंदी मालिकांचे ‘वेट अँड वॉच’

    गोव्यात 11 हिंदी मालिकांचे शूटिंग सुरू होते. त्यात ‘कुमकुम भाग्य’, ‘गुम है किसी के प्यार में’, ‘आपकी नजरो में’, ‘शौर्य और अनोखी की कहानी’, ‘कुंडली भाग्य’, ‘यह है चाहते’, ‘अपना टाईम भी आएगा’ आदी मालिकांचा समावेश आहे.

    शूटिंग बंद असले तरी बहुतेक मालिकांची टीम गोव्यातच तळ ठोकून आहे. झी टीव्हीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘सध्यातरी आमच्याकडे एपिसोड बॅंक आहे. पुढील शूटिंगसाठी आम्ही परवानगी मागितली आहे.’’

    जाहिरातींना फटका

    नवीन भागांचे शूटिंग नसल्याने वाहिनीला मालिकांचे जुने भाग दाखवावे लागतात. त्यात प्रेक्षकांना रस नसतो. त्यामुळे याचा फटका थेट जाहिरातींना आणि टीआरपीला बसतो.

    Goa bans shooting of films, series;Hindi, Marathi series found in crisis

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार