• Download App
    उर्जामंत्र्यांच्या डिबेटनंतर गोवा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले, राजकीय फायद्यासाठी आमच्या महान नेत्यांचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही|Goa and Delhi chief ministers clash after power minister debate, insults to our great leaders for political gain will not be tolerated

    उर्जामंत्र्यांच्या डिबेटनंतर गोवा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले, राजकीय फायद्यासाठी आमच्या महान नेत्यांचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गोवा आणि दिल्लीच्या उर्जामंत्र्यांत जाहीर डिबेट झाल्यावर दुसºयाच दिवशी दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात ट्विटरवॉर सुरू झाले आहे.Goa and Delhi chief ministers clash after power minister debate, insults to our great leaders for political gain will not be tolerated

    राजकीय फायद्यासाठी प्रचार करण्यास आप स्वतंत्र आहे. मात्र, गोव्यात येऊन आमच्या महान नेत्यांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, असा इशारा सावंत यांनी दिला आहे.दिल्लीचे उर्जा मंत्री सत्येंद्र जैन आणि गोव्याचे उर्जामंत्री नीलेश कैैबराल यांच्यात मोफत वीजेवर डिबेट झाली होती.



    आता दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकमेंकांवर गोव्यातील वरिष्ठ नेत्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. सत्येंद्र जैन यांनी गोव्याच्या राजकारण्यांना थर्ड रेट म्हणून त्यांना स्वीकारू नये असे आवाहन केले होते.
    यावर प्रमोद सावंत यांनी ट्विट करून म्हटले आहे की आप हा पक्ष कायमच विरोधाचे राजकारण करतो.

    नाटकबाजी करून स्वस्त दर्जाचे राजकारण करतो. मात्र, गोव्यातील लोक हे तिसऱ्या दर्जाचे नेते आहेत म्हणणे म्हणे भाऊसाहेब बांदोडकर, सिकेरा, मनोहर पर्रीकर, राजेंद्र अर्लेकर आणि श्रीपाद नाईक यांच्यासारख्या महान नेत्यांचा अपमान आहे. राजकीय फायद्यासाठी प्रचार करण्यास आप स्वतंत्र आहे. मात्र, गोव्यात येऊन आमच्या पक्षाचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही.

    यावर केजरीवाल यांनी ट्विट करून उत्तर देताना म्हटले आहे की, वर्तमानातील राजकीय नेत्यांची तुलना पूर्वीच्या महान नेत्यांशी करणे त्यांचा अपमान आहे. सध्याच्या भाजपमध्ये भाऊसाहेब बांदोडकर यांच्यासारखी महानता नाही किंवा डॉ. सिकरा यांच्यासारखी सत्यनिष्ठा नाही. आताचा कोणीही नेता मनोहर पर्रीकर यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला नाही.

    फोडाफोडीसाठी आमदारांची खरेदी-विक्री करून भाऊसाहेब बांदोडकरांचा अपमान केला गेला आहे. डॉ. जैैक सिकेराहे यांनी केलेला संघर्ष हा गोव्यात मते खरेदी आणि विक्री करण्यासाठीचा नव्हता. कॉँग्रेसच्या आमदारांची होलसेल विक्री करण्यासाठी मनोहर पर्रीकर यांनी प्रयत्न केले नव्हते.

    Goa and Delhi chief ministers clash after power minister debate, insults to our great leaders for political gain will not be tolerated

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य