विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने झाशीच्या राणीचा गौरव केला आहे. झाशी रेल्वे स्टेशनचे वीरांगना लक्ष्मीबाई रेलवे स्टेशन असे नामकरण करण्यात आले आहे.Glory of Queen of Jhashi, Naming of Jhashi Railway Station Veerangana Lakshmibai Railway Station
केंद्र सरकारनेही झाशी रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तांत्रिक बाकींची पूर्तता करण्यात आल्यावर नामकरणाची अधिसूचना जारी करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारकडे झाशी रेल्वे स्टेशनचे वीरांगना लक्ष्मीबाई असे नामकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता.
- झाशीच्या राणीला योगी आदित्यनाथांचे अभिवादन, झाशी रेल्वे स्टेशनला देणार वीरांगणा लक्ष्मीबाई यांचे नाव
त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली. यापूर्वी योगी आदित्यनाथ सरकारने मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय असे ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर इलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज असे बदलण्यात आले आहे. फैजाबादचेही नाव अयोध्येचा असे केले गेले आहे.
झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाणाºया राणी लक्ष्मीबाई या १८५७ च्या राष्ट्रीय उठावातील अग्रणी सेनानी होत्या. मेरी झॉँशी नहीं दूॅँगी असे म्हणत त्यांनी इंग्रंजांविरुध्द युध्द पुकारले होते.
Glory of Queen of Jhashi, Naming of Jhashi Railway Station Veerangana Lakshmibai Railway Station
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक
- पुणे रेल्वे स्थानकावर मास्क न वापरल्याने तब्बल २,७०० जणांवर कारवाई
- ब्रेकिंग : मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियावर गोळीबार
- प्रियांका गांधी म्हणाल्या, देश के लिए मिलकर लढेंगे जितेंगे!!; पण सुनील शास्त्री यांचा प्रतिसाद का नाही??