• Download App
    पर्यावरण बदलाचा परिणाम जननक्षमतेवरही, प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती।Global warming affects animal kingdom

    पर्यावरण बदलाचा परिणाम जननक्षमतेवरही, प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती

    विशेष प्रतिनिधी

    कॅनबेरा : प्राण्यांमधील जननक्षमतेवर पर्यावरण बदलाचाही मोठा परिणाम होत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. मेलबर्न विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे. Global warming affects animal kingdom

    त्यामुळे प्रजातींचे अस्तित्व हे ते कोणत्या तापमानात टिकून राहतात यापेक्षा कोणत्या वातावरणात ते पुनरुत्पादन करू शकतात, यावर अवलंबून असल्याचे दिसत आहे. हा शोध अत्यंत महत्त्वाचा असून प्रजाती नष्ट होण्यामागे तापमान हे एक कारण असू शकते. तसेच, पर्यावरण बदलाचा प्राण्यांवर होणाऱ्या परिणामांबाबतही अधिक अभ्यास आवश्यतक असल्याचे यामुळे दिसून येत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.



    तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यास, उष्णता सहन न झाल्याने प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. मात्र, अशा प्रकारच्या तापमानात काही प्रजातींमधील नरांमधील जननक्षमता कमी होत असल्याचे आमच्या संशोधनातून दिसून आल्याचे मेलबर्न विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले.
    घरमाश्यांाच्या ४३ प्रजातींवर अभ्यास करून ब्रिटन, स्वीडन आणि ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी एक अहवाल आज प्रसिद्ध केला.

    या प्रजातींमधील नर माश्यांवना वेगवेगळ्या तापमानाखाली चार तास ठेवण्यात आले. अधिक तापमानात जननक्षमता कमी होत असल्याचे यावेळी आढळून आले. अधिक तापमानामुळे ४३ पैकी ११ प्रजातींची ८० टक्के जननक्षमता कमी झाल्याचे दिसून आले.

    Global warming affects animal kingdom

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र