… तर जम्मू-काश्मीरमध्ये दहशत निर्माण केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक नसलेल्यांना घरे देण्यास दहशतवादी संघटनांकडून विरोध दर्शवला जात असून धमक्या दिल्या जात आहेत. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (पीएएफएफ) ने असा इशारा दिला आहे की, जर स्थानिक नसलेल्यांना येथे फ्लॅट दिले तर ते जम्मू-काश्मीरमध्ये दहशत निर्माण करतील. Giving houses to people outside Jammu and Kashmir will not be tolerated Terrorists threaten
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत येथील काही बिगर स्थानिक लोकांना घरे दिली जाणार आहेत . यासाठी जम्मू-काश्मीर गृहनिर्माण मंडळाने २९ एप्रिल रोजी घोषणा केली होती. यानंतर दहशतवादी संघटनेने ही धमकी दिली.
भारतातील प्रतिबंधित दहशतवादी संघटना पीएमएफचे म्हणणे आहे की, येथे बिगर स्थानिकांना घरे देणे खपवून घेतले जाणार नाही. त्यांना घर दिल्यास ते येथे दहशतवादी कारवाया करू शकतात. PAFF ही जैशची प्रॉक्सी दहशतवादी संघटना आहे, ज्यांनी पुंछ हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. या महिन्यात झालेल्या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते.
जम्मू आणि काश्मीर गृहनिर्माण मंडळाने काल सांगितले की, ३३६ गैर-स्थानिकांना येथे EWS कोट्याअंतर्गत घरे दिली जातील. दहशतवादी संघटनेने याला विरोध करत अवैध धंदे करणाऱ्यांना तेथे स्थायिक होऊ देणार नसल्याचे सांगितले. दहशतवाद्यांनी दिल्लीपर्यंत धमकी दिली आणि सांगितले की, यावेळी त्याची आग जम्मू-काश्मीरमध्येच नाही तर दिल्लीतही पसरेल.
Giving houses to people outside Jammu and Kashmir will not be tolerated Terrorists threaten
महत्वाच्या बातम्या
- Watch : PM मोदींच्या ‘मन की बात’च्या 100 व्या भागाची कशी झाली तयारी? पाहा पडद्यामागील काही अद्भुत क्षण…
- ‘Mann Ki Baat @ 100’ : बिल गेट्स यांनी “मन की बात”च्या शतकाबद्दल पंतप्रधान मोदींना दिल्या शुभेच्छा, म्हणाले…
- मन की बात @100 : मुंबईत भाजपचे 5000 ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन
- भाजपचे टॉप बॉसेस कर्नाटकच्या रणमैदानात व्यग्र; विरोधकांचे बॉसेस कुस्तीगीर आंदोलनाला चिथावणी देण्यात व्यस्त!!