• Download App
    मोदी काशीतून लढू शकतात, तर योगी मथुरेतून का नाही लढणार??; योगींना मथुरेतून तिकीट देण्यासाठी भाजप खासदाराचे जे. पी. नड्डांना पत्र!! । Give BJP ticket to Yogi from Mathura

    मोदी काशीतून लढू शकतात, तर योगी मथुरेतून का नाही लढणार??; योगींना मथुरेतून तिकीट देण्यासाठी भाजप खासदाराचे जे. पी. नड्डांना पत्र!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात मधून काशीमध्ये येऊन लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. काशीचा संपूर्ण कायापालट करू शकतात, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूरमधून मथुरेत येऊन निवडणूका का लढवू शकत नाहीत?, त्यांना मथुरा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली तर मथुरावासीयांसाठी तो आनंददायी क्षण असेल, अशा शब्दांत भाजपचे राज्यसभा खासदार हरणाची हरनाथ सिंग यादव यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिले आहे.  Give BJP ticket to Yogi from Mathura

    योगी आदित्यनाथ हे कर्तृत्ववान मुख्यमंत्री आहेत. उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे असे वाटते आणि ते स्वाभाविकही आहे. परंतु योगी आदित्यनाथ यांना मथुरा मतदारसंघातून तिकीट द्यावे, अशी ब्रजवासीयांची मनापासून इच्छा आहे. भगवान श्रीकृष्णांनी मला आपल्याला पत्र लिहिण्याची प्रेरणा दिली आहे, असे खासदार हरनाथ सिंग यादव यांनी पत्रात नमूद केले आहे.



    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात मधून काशीमध्ये येतात. लोकसभेची निवडणूक लढवतात काशीचा संपूर्ण कायापालट करतात. तशीच अपेक्षा ब्रजवासीयांची योगी आदित्यनाथ यांच्याकडून आहे. योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मधून मथुरेत येऊन विधानसभेची निवडणूक लढवावी.  थुरावासीयांना विविध विकास प्रकल्पांची त्यांनी भेट द्यावी_ अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे. खासदार हरनाथ सिंग यादव यांचे पत्र म्हणजे ब्रजवासीयांच्याच मनाचे प्रतिबिंब दिसत आहे.

    Give BJP ticket to Yogi from Mathura

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!