वृत्तसंस्था
फिरोजाबाद : कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहिम वेगात सुरु आहे. परंतु उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तीन दिवसांत लसीकरण प्रमाणपत्र जमा करा अन्यथा पगार मिळणार नाही, असे फर्मान जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. Give a vaccination certificate, otherwise no salary
फिरोजाबादचे जिल्हाधिकारी च्रंद्रविजय सिंह यांना माहिती मिळाली की, अनेक सरकारी कर्मचारी, अधिकारी यांनी लस घेतलेली नाही. त्यामुळे त्यांनी सरकारी आदेश काढले होते. ज्यांनी डोस घेतले नाहीत त्यांना मे महिन्याचं पगार देऊ नये, असं आदेशात म्हटलं आहे. या आदेशामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. अनेक कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्राकडे धाव घेतली आहे. लसीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रांगा लावल्या होत्या.
Give a vaccination certificate, otherwise no salary
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना काळात कैद्यांची गर्दी होणार कमी, राज्यात कारागृहांमधील ५४२ कैद्यांना तात्काळ पॅरोल
- राणीच्या बागेत आता गुंजणार चित्ता तसेच पांढऱ्या सिंहांची डरकाळी
- स्वच्छ भारत मिशन ! ‘ग्रँड वॉटर सेव्हिंग चॅलेंज’- केंद्र सरकार देत आहे ५ लाख रुपये जिंकण्याची संधी ; २५ जून पूर्वी करा अर्ज
- सोशल मीडियाच्या स्वयंघोषित फॅक्ट चेकर्सवर रविशंकर प्रसादांचा तिखट प्रहार; मोदी व्देषाच्या कारस्थानाची पोलखोल
- पवारांचे राजकारण ४० वर्षे ओळखत असल्याचे सांगत प्रकाश आंबेडकरांची खासदार संभाजीराजेंबरोबर जाण्याची तयारी