• Download App
    मुलींच्या लग्नाचे वय : समाजवादीच्या दोन मुस्लिम खासदारांच्या वक्तव्यांवरून अखिलेश यांनी हात झटकले!! |Girls marriage age; akhilesh yadav shunned samajwadi muslim MPs statements

    मुलींच्या लग्नाचे वय : समाजवादीच्या दोन मुस्लिम खासदारांच्या वक्तव्यांवरून अखिलेश यांनी हात झटकले!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ : मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून वाढवून 21 करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोदी मंत्रिमंडळाने त्या प्रस्तावास मंजुरी देखील दिली आहे. आता हा कायदा संसदेत मंजूर होईल. परंतु, त्याआधीच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तसेच मुस्लीम खासदार आमदार तसेच अन्य लोकप्रतिनिधींनी या प्रस्तावाला विरोध सुरू केला आहे.Girls marriage age; akhilesh yadav shunned samajwadi muslim MPs statements

    या संदर्भात समाजवादी पक्षाचे खासदार शफिक उर रहमान बर्क आणि डॉ. एस. टी. हसन यांनी काही वक्तव्य केली आहेत. सोशल मीडियामुळे मुली आधीच बिघडल्या आहेत. आता त्यांचे लग्नाचे वय वाढल्याने त्या आणखीनच बिघडतील,



    असे वक्तव्य शफिक उर रहमान बर्क यांनी केली आहे, तर तर डॉ. एस. टी. हसन यांनी सध्या मुली वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत वयात येतात. त्यामुळे तेच लग्नाचे योग्य वय आहे, असे वक्तव्य केले आहे.

    मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून समाजवादी पक्षाचे प्रमुख उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हात झटकून टाकले आहेत. समाजवादी पक्षाच्या खासदारांच्या वक्तव्याशी समाजवादी पक्षाचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. समाजवादी पक्ष हा प्रगतिशील विचारांचा पक्ष आहे.

    महिला आणि मुलींच्या अधिकारासाठी समाजवादी पक्षाने आपल्या राजवटीच्या काळात उत्तर प्रदेशात विविध कायदे केले आहेत. त्यामुळे पक्षाचे दोन खासदार काय म्हणतात?, याचा समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय धोरणाची काहीही संबंध नाही, असे वक्तव्य अखिलेश यादव यांनी केले आहे.

    परंतु पक्षाच्या धोरणाविरोधात जर पक्षाचे दोन वरिष्ठ खासदार वक्तव्य करत असतील तर त्यांच्यावर पक्षीय दृष्टीकोनातून काही कारवाई करणार करणार का?, याबाबत मात्र अखिलेश यादव यांनी मौन पाळले आहे.

    म्हणजे एकीकडे समाजवादी पक्षाची प्रतिमा प्रगतीशील पुरोगामी असे दाखवायचे आणि त्याच वेळी आपल्या पक्षाचे खासदारांनी या प्रतिमेला तडा जाईल, असे वक्तव्य केले तरी या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करायचे असेच राजकीय सोयीचे धोरण अखिलेश यादव यांनी अवलंबल्याचे दिसत आहे.

    Girls marriage age; akhilesh yadav shunned samajwadi muslim MPs statements

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट