विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ज्यावेळी बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर यांनी 1990 च्या दशकामध्ये लिफ्ट लिबरल नेटवर्क तयार केले त्यावेळी त्यांना “मोठ्ठे मुत्सद्दी” म्हणून गौरवले गेले. पण डोनाल्ड ट्रम्प + मोदी आणि मी नुसते बोललो तरी लगेच लोकशाहीला धोका उत्पन्न असल्याचा डांगोरा पिटला जातो. हा लेफ्ट लिबरलचा दांभिक कावा आहे अशा शब्दांमध्ये इटलीच्या पंतप्रधान त्यांनी जगातल्या डाव्या इकोसिस्टीमचे वाभाडे काढले. कंजर्वेटिव्ह पॉलिटिकल ॲक्शन फोरमवर त्या बोलत होत्या.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प जनमताच्या पाठिंब्यावर निवडून आले, तेव्हा डाव्या इकोसिस्टीमला वाईट वाटले. डावी इकोसिस्टीम नेहमीच दुटप्पी भूमिका घेऊन ट्रम्प + मेलोनी + मोदी यांच्यावर चिखलफेक करते. त्याची आता आम्हाला सवय झाली आहे, असा टोला मेलोनी यांनी लगावला.
कोणाचा 1990 च्या दशकातला प्रभाव जगभरातल्या कुठल्याच देशातल्या जनतेवर उरलेला नाही. त्यामुळे जनता आमच्यासारख्यांनाच मतदान करून सत्तेवर बसवते. डाव्या इकोसिस्टीमचा आता जनतेवरचा प्रभाव कमी झालाय. त्या उलट आपापल्या देशाचे हित जपणाऱ्या शक्तींचा प्रभाव वाढलाय, असे निरीक्षण देखील मेलोनी यांनी नोंदविले. जगभरातल्या हुकूमशाही विरुद्ध आमचा लढा असाच सुरू राहील. ट्रम्प सत्तेवर असताना अफगाणिस्तान मध्ये तुम्हाला रक्तलांछित क्रांतीच्या नावाखाली कुठला हस्तक्षेप दिसणार नाही, असा विश्वास मेलोनी यांनी व्यक्त केला. मेलोनी यांच्या या भाषणाचा व्हिडिओ जगभरात प्रचंड व्हायरल झाला.