• Download App
    फुटीरवादी नेते सय्यद शाह गिलानींचा मृतदेह पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळला! । Gilanis body seen with Pakistani flag in vdo

    फुटीरवादी नेते सय्यद शाह गिलानींचा मृतदेह पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळला!

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : फुटीरवादी नेते सय्यद शाह गिलानी यांच्या दफनविधीपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात त्यांचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळलेला दिसतो. Gilanis body seen with Pakistani flag in vdo

    हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जम्मू आणि काश्मीार पोलिसांनी ‘यूएपीए’तंर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या झेंड्यात लपटलेल्या गिलानी यांच्या मृतदेहाभोवती बरेच लोक दिसतात आणि त्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. खोलीत घोषणाबाजी आणि गोंधळ होतानाही दिसतो. यात एक सशस्त्र पोलिस कर्मचारी देखील दिसतो.



    पाकिस्तानचे संकेतस्थळ ‘दुनियान्यूज’ च्या वेबडेस्कने सय्यद गिलानी यांचा मृतदेह पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळण्यात आल्याचे वृत्त दिले आहे. गिलानी यांच्या मृतदेहाजवळ उभे असलेल्या नागरिकांनी पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या, असे वृत्तात म्हटले आहे. याप्रकरणी यूएपीए (अनलॉफूल ॲक्टिव्हिटीज) कायद्यार्तंगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जम्मू काश्मी(रचे फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे बुधवारी निधन झाले. श्रीनगरच्या हैदरपूरा येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच काश्मीरर खोऱ्यात जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच मोबाईल इंटरनेट सेवाही स्थगित करण्यात आली. पाकिस्तान समर्थक फुटीरवादी नेत्याचे त्यांच्या निवासस्थानाजवळच एका मशीद परिसरात दफन करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचा मृतदेह घरात असताना पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळला होता.

    Gilanis body seen with Pakistani flag in vdo

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो