• Download App
    Ghulam Nabi Azad शिष्टमंडळासोबत परदेश दौऱ्यावर गेलेल्या

    Ghulam Nabi Azad : शिष्टमंडळासोबत परदेश दौऱ्यावर गेलेल्या गुलाम नबी आझाद यांची तब्येत बिघडली

    Ghulam Nabi Azad

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Ghulam Nabi Azad ऑपरेशन सिंदूरनंतर, भारतीय खासदार आणि नेत्यांचे शिष्टमंडळ पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी विविध देशांना भेट देत आहेत. या सर्वपक्षीय शिष्टमंडळात कुवेतला गेलेले गुलाम नबी आझाद आजारी पडले आहेत.Ghulam Nabi Azad

    जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) चे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांना मंगळवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या कुवेत दौऱ्यादरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यासोबत परदेश दौऱ्यावर गेलेले भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, जेव्हा आम्ही रुग्णालयात गुलाम नबी आझाद यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांचे डोळे भरून आले.



    निशिकांत दुबे म्हणाले की, त्यांची तब्येत बिघडली असूनही, त्यांनी देशाच्या प्रतिनिधी मंडळाचा भाग होण्याची तयारी दर्शवली. आजही जेव्हा आम्ही त्यांना रुग्णालयात भेटलो तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. आजकाल असे राजकारणी सापडणे कठीण आहे.

    गुलाम नबी आझाद ज्या शिष्टमंडळाचा भाग आहेत त्याचे नेतृत्व भाजप खासदार बैजयंत पांडा करत आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आणि आझाद यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्यांनी लिहिले, “आमच्या शिष्टमंडळाच्या भेटीच्या दरम्यान, गुलाम नबी आझाद यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांची प्रकृती स्थिर आहे, ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत आणि काही चाचण्या केल्या जातील. बहरीन आणि कुवेतमध्ये झालेल्या बैठकांमध्ये त्यांचे योगदान खूप प्रभावी होते आणि त्यांना अंथरुणाला खिळून राहावे लागले याबद्दल ते निराश आहेत. सौदी अरेबिया आणि अल्जेरियामध्ये त्यांची उणीव आम्हाला खूप जाणवेल.”

    Ghulam Nabi Azad’s health deteriorated while on a foreign tour with a delegation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते