प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस मधून बाहेर पडताना वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना 5 पानी पत्र लिहून आपल्या मनातली भडास बाहेर काढली आहे. त्यातही त्यांनी राहुल गांधी यांच्यावर थेट हल्लाबोल केला असून सोनिया गांधी यांना नामधारी अध्यक्ष म्हटले आहे. Ghulam Nabi Azad All Congress decisions are taken by Rahulji, his security guards and PAs
आझादांच्या पत्रातले मुद्दे
या पत्रात गुलाम नबी आझाद म्हणतात, गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः 2014 च्या दारूण आणि अपमानास्पद पराभवानंतर काँग्रेसमध्ये ज्येष्ठांचा वरिष्ठांचा अपमान करण्याची प्रथा परंपरा सुरू झाली. ती आजतागायत कायम असून पक्षाचे सगळे महत्वाचे निर्णय राहुल गांधी त्यांचे सिक्युरिटी गार्ड्स आणि पीए घेत आहेत.
ज्या नेत्यांना अजिबात जनमताचा पाठिंबा नाही ते चमचे नेते पक्षाच्या वरिष्ठ पदांवर बसवले गेले आहेत आणि ज्येष्ठांना खड्यासारखे दूर सारले आहे.
यूपीए सरकारमध्ये आपण बसवलेली रिमोट कंट्रोल सिस्टीम जनतेने नाकारली. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये आणि त्याच आसपासच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तरी देखील रिमोट कंट्रोल सिस्टीम बंद झाली नाही किंबहुना जनतेने नाकारलेली रिमोट कंट्रोल सिस्टीम काँग्रेस पक्षामध्ये अमलात आणली गेली.
या रिमोट कंट्रोल सिस्टीमनेच पक्षाचे भवितव्य कायमचे अंधारात लोटले आहे. आज पक्षामध्ये पुनरुज्जीवनाची शक्यताच नाही. काँग्रेस पक्ष “पॉईंट ऑफ नो रिटर्न”च्या अवस्थेपर्यंत येऊन ठेपला आहे.
सोनियाजी, आपण नाममात्र अध्यक्ष आहात. पक्षाचे सगळे निर्णय आजही राहुल गांधी त्यांचे सिक्युरिटी गार्ड्स आणि पीए घेत आहेत. पक्षाच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने ही सर्वाधिक वाईट बाब आहे. पक्षाला राजकीय भवितव्य उरले नसल्यामुळे मी नाईलाजाने आणि दुःखी अंतःकरणाने पक्ष सोडतो आहे.
या आणि अशा आशयाचे अनेक मुद्दे गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहेत. किंबहुना आपल्या मनातली सगळी खदखद आझाद यांनी या 5 पानी पत्रामध्ये व्यक्त करून काँग्रेसचा कायमचा त्याग केला आहे.
Ghulam Nabi Azad All Congress decisions are taken by Rahulji, his security guards and PAs
महत्वाच्या बातम्या
- झारखंडमध्ये सत्तासंकट : मुख्यमंत्री सोरेन यांची आमदारकी रद्द, तरीही पुन्हा तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता
- मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
- महाराष्ट्राच्या १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवासाचा लाभ!!
- महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ठाकरे सरकारचा प्रभाग पुनर्रचनेचा डाव; फडणवीसांचा गौप्यस्फोट