• Download App
    Ghulam Nabi Azad गुलाम नबी झाले होते "आझाद"; पण परत करणार का काँग्रेसची "गुलामी"

    Ghulam Nabi Azad : गुलाम नबी झाले होते “आझाद”; पण परत करणार का काँग्रेसची “गुलामी”?? की ही तर काँग्रेसचीच खेळी??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गुलाम नबी झाले होते “आझाद”??; पण परत करणार का काँग्रेसची “गुलामी”??, की ही तर काँग्रेसचीच खेळी?? असा असा सवाल जम्मू कश्मीर मधून येणाऱ्या बातम्यांमुळे तयार झाला आहे. Ghulam nabi azad will not return to Congress

    गुलाम नबी आझाद यांच्या डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी मधून ताज मोहीउद्दीन या त्यांच्या सहकार्याने पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आझाद यांना काँग्रेस वापसीची ऑफर दिली. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये गुलाब नवी आझाद यांच्या काँग्रेस मध्ये वापसीची चर्चा सुरू झाली.

    काँग्रेसमध्ये लोकशाही प्रणालीचे पालन होत नाही. लोकशाही प्रणालीनुसार सुधारणा होत नाहीत म्हणून 23 जणांचा एक गट स्थापन करून गुलाब नबी आझाद यांनी दोनच वर्षांपूर्वी राजकीय सुधारणांचा मोठा प्रयत्न केला होता. त्यामध्ये आनंद शर्मा, कपिल सिब्बल, पृथ्वीराज चव्हाण अशा मातब्बर नेत्यांचाही समावेश होता. परंतु, काँग्रेस श्रेष्ठींनी या g23 गटाचे काहीही ऐकले नाही. त्यामुळे कंटाळून गुलाम-नबी आझाद यांनी काँग्रेस सोडली आणि जम्मू-काश्मीरमध्ये स्वतःचा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी नावाचा पक्ष काढला.


    Indian Army : भारतीय लष्कराने इतिहास रचला, 15 हजार फूट उंचीवर जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल बनवले


    आझाद पक्षाचा खुलासा

    जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर तिथे राजकीय हालचालींना वेग आला आझाद यांचे सहकारी ताज मोहीउद्दीन यांनी त्यांची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी आझाद यांना देखील काँग्रेसमध्ये वापसीची ऑफर दिली. त्यामुळे आझाद आपला पक्ष मोडून काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याच्या अफवा सगळीकडे पसरल्या. आझाद यांच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. त्यामुळे आझाद यांच्या पक्षाचे प्रवक्ते सलमान निजामी यांनी स्पष्ट खुलासा करून आझाद यांचा काँग्रेस प्रवेश नाकारला. आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने किंवा आझाद यांनी एकमेकांशी संपर्क साधला नाही, असा खुलासा सलमान निजामी यांनी केला. केवळ आझाद यांच्या नव्या पक्षात चलबिचल निर्माण करण्यासाठी कुठून तरी या अफवा पसरवल्या जातात, असा आरोप करून सलमान निजामी यांनी काँग्रेसकडेच अंगुली निर्देश केला.

    जम्मू – कश्मीर विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने गुलाम नबी आझाद वेगवेगळ्या छोट्या पक्षांची युती किंवा आघाडी करायच्या बेतात असताना त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याने आझाद यांच्या पक्षात चलबिचल निर्माण होण्याबरोबरच काँग्रेस विषयी संशय तयार झाला आहे.

    Ghulam Nabi Azad will not return to Congress

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र