वॉशिंग्टन : अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात सहजपणे गेला याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना जबाबदार धरणाऱ्या माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अश्रफ घनी यांच्यावर टीका केली. Ghani was not reliable person
‘घनींवर माझा कधीही पूर्ण विश्वाीस नव्हता,’ असे ट्रम्प म्हणाले. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी देशातून पलायन केलेल्या अश्रफ घनींवर टीका केली. ‘‘मला त्यांच्याबद्दल कधीही पूर्ण विश्वालस वाटला नाही. ते कावेबाज असल्याचे मला कायम वाटत होते, असे मी जाहीरपणे व खेदाने सांगू इच्छितो.
आमच्या सिनेटरसाठी मर्जी राखणे व भोजनासह त्यांची बडदास्त ठेवणे यात ते त्यांचा वेळ घालवित असे. सिनेटर कायम घनी यांच्या खिशात असत,’’ असा दावा ट्रम्प यांनी केला. वेगवेगळ्या प्रकारे खून करून घनी पळून गेले असल्याचा गंभीर आरोपही त्यां नी केला, पण कोणते प्रकार हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
Ghani was not reliable person
महत्त्वाच्या बातम्या