• Download App
    सोरोसच्या अँटी मोदी कॅम्पेन पासून काँग्रेसने झटकले हात; पण मनमोहन सिंगांची मुलगी अमृत, शिवशंकर मेनन, हर्ष मंदर ते सलील शेट्टी सर्वांची सोरोसला साथ!! George soros has very close ties with Congress men and women from the past

    सोरोसच्या अँटी मोदी कॅम्पेन पासून काँग्रेसने झटकले हात; पण मनमोहन सिंगांची मुलगी अमृत, शिवशंकर मेनन, हर्ष मंदर ते सलील शेट्टी सर्वांची सोरोसला साथ!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आपल्या ओपन सोसायटी फाऊंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण जगभरातील विविध देशांमध्ये उत्पात घडविणारे अमेरिकेतील बिलिनिअर उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी जर्मनीतील म्युनिक मधून अँटी मोदी कॅम्पेनला सुरुवात केली. मोदीविरोधात जोरदार भाषण केले. भारतात मोदी सरकार घालवून लोकशाही प्रस्थापित करण्याची भाषा केली. मात्र सोरोस यांच्या भाषणानंतर भारतात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. लिबरल जमातीने नेहमीप्रमाणे सोरोस भाषण उचलून धरले, तर राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेऊन त्यावर भाष्य केले. भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले. George soros has very close ties with Congress men and women from the past

    पण काँग्रेसने तर अधिकृत पातळीवर जॉर्ज सरोस यांच्या भाषणापासून स्वतःचे हात झटकून टाकले. पण हाच तो काँग्रेस पक्ष आहे, ज्याच्या बड्या नेत्यांचे नातेवाईक अथवा निकटवर्ती सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशन साठी वरिष्ठ पदांवर काम करताना आढळले आहेत. यामध्ये माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची मुलगी अमृतसिंग, यूपीए सरकारच्या काळातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन आणि राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेत सामील झालेले सलील शेट्टी यांचा समावेश आहे.

    अमृतसिंग, शिवशंकर मेनन आणि सलील शेट्टी ही अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्वे आहेत. अमृतसिंग यांना यूपीए सरकारच्या काळात मानवाधिकाराच्या मुद्द्यावर अमेरिकेत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2009 पासून त्या जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाऊंडेशनशी जोडल्या गेल्या आहेत. फाऊंडेशनचे दहशतवाद विरोधी आणि अतिरेकी विचारसरणी वाद विरोधी कॅम्पेन त्या चालवतात. त्याची स्ट्रॅटेजी ठरवतात. शिवशंकर मेनन हे जॉर्ज सोरोस यांच्या अनेक फाउंडेशन पैकी एका फाउंडेशनचे बोर्ड मेंबर म्हणजे संचालक आहेत, तर राहुल गांधी यांच्या समावेत भारत जोडो यात्रेत चाललेले सलील शेट्टी हे तर सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत.

    सोरोस यांच्यासमवेत वर उल्लेख केलेली ही तीन प्रभावी व्यक्तिमत्व काम करत आहेत, ज्यांचा काँग्रेसची थेट संबंध आहे. तरी देखील काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी सोरोस यांनी यांच्या अँटी मोदी भाषणानंतर ताबडतोब ट्वीट करून काँग्रेसशी याचा कोणताही संबंध नसल्याचा दावा करत काँग्रेस पक्ष आणि बाकीचे विरोधी पक्ष नेहरूंचा मार्ग अवलंबून भारतात लोकशाहीची पुर्नस्थापना करतील असा दावा केला आहे. पण काँग्रेसशी संलग्न असलेल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वांचा सोरोस यांच्याशी असलेला तितकाच प्रभावी संबंध आता उघड्यावर आला आहे.

    या खेरीज काँग्रेसशी संबंधित एक प्रभावी व्यक्ती आहे, ज्यांचा जॉर्ज सोरोस यांच्याशी निकटचा संबंध आहे, मनमोहन सिंग यांच्या काळात सोनिया गांधी राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष होत्या. ही समिती थेट केंद्र सरकारला सल्ले द्यायची. या समितीला मनमोहन सिंग सरकारने वैधता प्राप्त करून दिली होती. या सल्लागार समितीत हर्ष मंदर हे एक सदस्य होते. हेच हर्ष मंदर जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाऊंडेशनचे मानवाधिकार सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आहेत.

    George soros has very close ties with Congress men and women from the past

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका