• Download App
    राजस्थानात गेहलोत मंत्रिमंडळात बदल; सचिन पायलट आनंदले!! । Gehlot cabinet reshuffle in Rajasthan; Sachin Pilot is happy !!

    राजस्थानात गेहलोत मंत्रिमंडळात बदल; सचिन पायलट आनंदले!!

    वृत्तसंस्था

    जयपूर : राजस्थानात काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मंत्रिमंडळात फेरबदल करणा-याला भाग पाडल्यानंतर अकरा नव्या मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. त्यामुळे काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आनंदले आहेत. त्यांनी स्वतःहून पत्रकार परिषद घेत नव्या मंत्रिमंडळाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे. Gehlot cabinet reshuffle in Rajasthan; Sachin Pilot is happy !!

    राजस्थानात बऱ्याच वर्षांपासून दलित मंत्री नव्हते. आता चार दलित नेत्यांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. ओबीसी वर्ग, अल्पसंख्यांक यांच्याकडेही लक्ष देऊन त्यांचे प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात वाढविण्यात आले आहे, अशी माहिती सचिन पायलट यांनी दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाची सचिन पायलट यांनी प्रशंसा केली आहे.

    सोनिया गांधी यांना मी मध्यंतरी भेटलो होतो. राजस्थानातील सर्व राजकीय परिस्थितीने त्यांच्या कानावर घातली होती. त्यांनी त्या परिस्थितीचे आकलन करून योग्य तो निर्णय घेतला. त्यामुळे आज मंत्रिमंडळात फेरबदल होऊन ते सर्वसमावेशक बनते आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व मला जी जबाबदारी देईल, ती मी समर्थपणे सांभाळीन, असा विश्वास सचिन पायलट यांनी व्यक्त केला आहे.

    मंत्रिमंडळ हे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असते. राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होत आहेत. परंतु त्याचे विश्लेषण आणि वैशिष्ट्यांचे वर्णन मात्र सचिन पायलट करताना दिसत आहेत. याचा सरळ राजकीय आज काँग्रेसमध्ये सचिन पायलट गटाला आता काँग्रेस श्रेष्ठींनी महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सचिन पायलट पुढे येऊन सध्या सगळे बोलत आहेत.

    Gehlot cabinet reshuffle in Rajasthan; Sachin Pilot is happy !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार