• Download App
    गौतम गंभीरला तिसऱ्यांदा धमकी, दिल्ली पोलीसांतही आमचे गुप्तहेर असल्याचा कथित इसीसचा दावा|Gautam Gambhir has been threatened for the third time

    गौतम गंभीरला तिसऱ्यांदा धमकी, दिल्ली पोलीसांतही आमचे गुप्तहेर असल्याचा कथित इसीसचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना कथित इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड काश्मीर या संघटनेकडून पुन्हा धमकी देण्यात आली आहे.’दिल्ली पोलीस आणि आयपीएस अधिकारी श्वेता काही करू शकत नाही. आमचे गुप्तहेर दिल्ली पोलीसमध्ये आहेत आणि तुझी सगळी माहिती आम्हाला मिळत आहे,’ असे धमकीच्या इमेलमध्ये म्हटले आहे.Gautam Gambhir has been threatened for the third time

    गौतम गंभीरला आठवडाभरात तिसऱ्यांदा धमकीचा इमेल पाठवण्यात आला आहे. यापूर्वी मेलद्वारे गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारा इमेल पाठवण्यात आला होता. गंभीरला २३ नोव्हेंबर रोजी रात्री पहिला धमकीचा इमेल पाठवण्यात आला होता. त्यात त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.



    गंभीरने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. त्यानंतर २४ नोव्हेंबरला पुन्हा त्याला एक मेल मिळाला. त्यात ‘कालच तुझी हत्या करणार होतो, मात्र, तू वाचलास. काश्मीरपासून दूरच राहा’ असे त्या मेलमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानंतर एका मेलमधून गंभीरच्या घराबाहेरील एक व्हिडिओही पाठवण्यात आला होता. हे धमकीचे मेल आयएसआय काश्मीरने दिल्याचा आरोप गंभीरने केला होता.

    नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा भाऊ म्हणून संबोधले होते. या त्यांच्या वक्तव्यावर २० नोव्हेंबरला गौतम गंभीर याने टीका केली होती. पंजाबचे नेते सिद्धू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होताा. त्यात एक पाकिस्तानी अधिकारी इम्रान खान यांच्या वतीने त्यांचे स्वागत करताना दिसत होता.

    त्यावेळी इम्रान खान मोठ्या भावासारखे आहेत, असे बोलताना स्द्धिू दिसतात. त्यावर गंभीरने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. सिद्धू यांची मुले भारतीय लष्करात असते, तर ते करतारपूर साहिबमध्ये इम्रान खान यांना आपला मोठा भाऊ म्हणाले असते का? असा सवाल गंभीरने केला होता. सिद्धू गेल्या महिनाभराच्या कालावधीत काश्मीरमध्ये ४० नागरीक आणि जवानांच्या हत्येवर एक चकार शब्द काढत नाहीत, असेही गंभीर म्हणाला होता.

    Gautam Gambhir has been threatened for the third time.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची