• Download App
    गौतम अदानींनी घेतली ओडिशा रेल्वे अपघातात आई-वडील गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, स्वत: दिली माहिती|Gautam Adani took responsibility for the education of children who lost their parents in the Odisha train accident, informed himself

    गौतम अदानींनी घेतली ओडिशा रेल्वे अपघातात आई-वडील गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, स्वत: दिली माहिती

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मोठी घोषणा केली आहे. या रेल्वे अपघातात आई-वडील गमावलेल्या सर्व मुलांच्या शालेय शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी गौतम अदानी यांनी उचलण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द गौतम अदानी यांनी रविवारी (4 जून) ट्विट करून ही माहिती दिली आहे.Gautam Adani took responsibility for the education of children who lost their parents in the Odisha train accident, informed himself

    गौतम अदानी यांनी ट्विट केले की, ‘ओडिशातील रेल्वे दुर्घटनेमुळे आम्ही सर्वजण अतिशय दुःखी आहोत. या दुर्घटनेत ज्या निष्पापांनी आपले पालक गमावले आहेत, त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार असल्याचे आम्ही ठरवले आहे.



    मुलांचे चांगले भविष्य घडवणे ही आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी

    अदानी पुढे म्हणाले, ‘पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ देणे आणि मुलांना चांगले भविष्य देणे ही आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे.’ शुक्रवारी (2 जून) ओडिशातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या या रेल्वे अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 1175 जण जखमी झाले असून त्यापैकी 793 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

    Gautam Adani took responsibility for the education of children who lost their parents in the Odisha train accident, informed himself

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक