वृत्तसंस्था
मुंबई : हिंडेनबर्ग रिपोर्ट वर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सनी जबरदस्त उसळी मारली आणि अदानी ग्रुपच्या मार्केट व्हॅल्यू मध्ये तब्बल 15 अब्ज डॉलर्सने भर पडली. Gautam Adani stocks add dollar 15 billion in best day since Hindenburg report
अदानी टोटल गॅसच्या शेअर्सची व्हॅल्यू तब्बल 20 % वाढली त्या पाठोपाठ अदानी एनर्जी सोल्युशन्स 13 %, अदानी स्पोर्ट्स 6% आणि त्यानंतर अदानी पॉवर, अदानी विल्मर, एनडीटीव्ही, अंबुजा आणि एसीसी सिमेंट यांच्या शेअर्सच्या व्हॅल्यू मध्ये तब्बल 2 % ते 7 % नी वाढ झाली.
शॉर्ट सेलर्स हिंडेनबर्गने अदानी समूहावर मोठ्या प्रमाणावर हेराफेरी केल्यास आरोप केला होता. त्यामुळे देशात काँग्रेसने अदानी समूह आणि मोदी सरकार यांच्याविरुद्ध वातावरण तापविले होते. राहुल गांधी तर अदानी समूहाविरुद्ध रोज काही ना काही तरी बोलत राहिले.
या पार्श्वभूमीवर 2023 च्या दिवाळीनंतर अदानी समूहासाठी आजचा सर्वाधिक कमाईचा दिवस ठरला. एकतर हिंडेनबर्ग रिपोर्ट संदर्भात सुप्रीम कोर्टाचा शुक्रवारी निर्णय आला. त्यापाठोपाठ आज अदानी समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स जोरदार उसळी घेतली ही उसळी 2 % ते 20 % रेंजमध्ये असल्याने संपूर्ण अदानी समूहाच्या मार्केट व्हॅल्यू मध्ये तब्बल 15 अब्ज डॉलर्सने भर पडली.
Gautam Adani stocks add dollar 15 billion in best day since Hindenburg report
महत्वाच्या बातम्या
- Nitish Kumar : नितीश कुमार सरकारने मुस्लीम सणांसाठी शाळांमधील सुट्टी वाढवली, तर हिंदू सणांसाठीची केली कमी!
- ”महात्मा गांधी हे महापुरुष होते, तर पंतप्रधान मोदी हे…” ; उपराष्ट्रपतींचं मोठं विधान!
- मल्लिकार्जुन खर्गे तेलंगणात भरसभेत भडकले अन् उपस्थितांना म्हणाले, ‘गेट आउट’
- ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक; प्रवासी थोडक्यात बचावले