प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भांडवलदार धार्जिणे म्हणून टार्गेट करताना काँग्रेसने सातत्याने उद्योगपती अंबानी आणि अदानी यांच्यावर शरसंधान साधले आहे, पण यापैकी गौतम अदानी हे मात्र सायन्स सेंटरच्या निमित्ताने शरद पवारांच्या बारामतीत पोहोचले. Gautam Adani Pawar’s Baramati for the inauguration of Science Center
राजीव गांधी टेक्नोलॉजी इन्फोर्मेशन मिशन अंतर्गत बारामतीत राज्य शासनातर्फे सायन्स अंड इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह गौतम अदानी आणि भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर उपस्थित होते.
देशातल्या आर्थिक प्रश्नांच्या मुद्द्यांवर केंद्रातल्या मोदी सरकारवर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी नेहमी शरसंधान साधत असतात. त्यावेळी गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांचा उल्लेख ते मोदींचे मित्र म्हणून करत असतात.
अर्थातच बाकीचे काँग्रेस नेते देखील मोदींना भांडवलदार धार्जिणे म्हणून हिणवत असतात. परंतु, यापैकी महत्त्वाचे उद्योगपती गौतम अदानी मात्र यांची मात्र, शरद पवारांशी जवळीक आजच्या बारामतीच्या कार्यक्रमातून दिसून आली. मध्यंतरी मुंबईतील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या व्यवसायिक कौशल्यावर स्तुतिसुमने उधळली होती तर आज त्यांना बारामतीत सायन्स अँड इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटनासाठी निमंत्रित केले होते.
गौतम अदानी यांचे विमानतळावर आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले. त्यांच्या गाडीचे सारथ्य देखील केले. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी शरद पवार, अजित उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबीयांनी यांनी त्यांचे स्वागत केले. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रात एकत्र सत्तेवर आहेत. परंतु काँग्रेसची भूमिका सातत्याने आदमी आणि अंबानींना राजकीयदृष्ट्या टार्गेट करण्याचे राहिली आहे, तर दुसरीकडे शरद पवार मात्र आपली गौतम अदानी यांच्याशी असलेली जवळीक दाखवून द्यायला विसरत नाहीत. हेच बारामतीतल्या कार्यक्रमातून स्पष्ट झाले आहे.
बारामतीत उभारले आहे, तशीच सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर्स महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये निर्माण करण्यात येतील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
Gautam Adani Pawar’s Baramati for the inauguration of Science Center
महत्वाच्या बातम्या