- जगातल्या टॉप 10 मध्ये मुकेश अंबानींचाही समावेश
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : “उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी!!”, ही मराठी म्हण भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी जागतिक पातळीवर सिद्ध केली आहे. भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. Gautam Adani is the second richest man in the world
जगभरात उद्योगाचे विस्तीर्ण जाळे
जागतिक पातळीवरची बंदरे विकसित करण्यापासून सर्वसामान्य खाद्य उद्योगापर्यंत अदानी उद्योग समूहाचे जाळे जगभरात विस्तीर्ण झाले आहे. गौतम अदानी यांची संपत्ती 154.7 अब्ज डॉलर (सुमारे 12.34 लाख कोटी रुपये) आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी यांनी फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकून दुसरे स्थान मिळविले आहे. फोर्ब्स अब्जाधीशांच्या सूचीमध्ये टॉप-2 मध्ये आशियाई व्यक्तीने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
एलन मस्क नंबर 1
रँकिंगमध्ये गौतम अदानी आता फक्त एलन मस्क यांच्या मागे आहेत. टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांची 21.83 लाख कोटी ($273.5 अब्ज) संपत्तीसह या यादीत अव्वल स्थानावर आहेत. 12.27 लाख कोटी ($ 153.8 अब्ज) संपत्तीसह बर्नार्ड अरनॉल्ट तिसरे आणि जेफ बेझोस 11.95 लाख कोटी ($ 149.7 अब्ज) संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
मुकेश अंबानी टॉप 10 मध्ये
अदानी व्यतिरिक्त रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे श्रीमंताच्या टॉप 10 यादीत स्थान मिळवणारे दुसरे भारतीय आहेत. मुकेश अंबानी हे 7.35 लाख कोटी ($92.1 अब्ज) संपत्तीसह जगातील 8 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
Gautam Adani is the second richest man in the world
महत्वाच्या बातम्या
- Roger Federer Profile : टेनिस कोर्टवर प्रेम, दोनदा जुळ्या मुलांचा बाप… अशी आहे टेनिसपटू रॉजर फेडररची प्रेमकहाणी
- रॉजर फेडररची निवृत्ती : टेनिसचा बादशाह रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा, लेव्हर कपमध्ये खेळणार शेवटचा सामना
- लखीमपूर खिरी प्रकरण : पीडितेच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर, सीएम योगींचे फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे निर्देश
- मनी लाँडरिंग प्रकरण : जॅकलिननंतर अभिनेत्री नोरा फतेहीची दिल्ली पोलिसांकडून पाच तास कसून चौकशी