विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तेल कंपन्यांकडून आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल १०९.२४ डॉलरवर पोहोचले आहे. तेलाच्या वाढत्या किमतींवर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, अमेरिका, कॅनडासह विकसित देशांमध्ये एका वर्षात पेट्रोलच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर भारतात केवळ पाच टक्के वाढ झाली आहे. Gasoline and diesel prices rise by only 5 per cent in the US, 50 per cent in Canada
गेल्या ५ दिवसांत दिल्लीत सीएनजी ६.६० रुपये किलोने महागला आहे. तर १६ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. काल पेट्रोलचे दर ७४ ते ८४ पैशांनी वाढले आहेत, तर डिझेलच्या दरातही ७५ ते ८५ पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल १०५.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९६.६७ रुपये प्रति लीटर मिळत आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर १२०.५१ रुपये तर डिझेलचा दर १०४.७७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत ११५.१२ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ९९.८३ रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोल ११०.८५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १००.९४ रुपये प्रति लिटर आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नव्हती.
या राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपयांच्या पुढे आहे, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांवर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सीएनजी गॅसच्या दरात २.५० रुपयांनी वाढ केल्यानंतर आता ती ६६.६१ रुपये प्रति किलो झाली आहे. वाहनांच्या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या १६ दिवसांत २४ मार्च आणि १ एप्रिल असे दोनच दिवस तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नव्हता.
Gasoline and diesel prices rise by only 5 per cent in the US, 50 per cent in Canada
महत्त्वाच्या बातम्या
- कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या?, किती दहशतवादी घटना घडल्या? सरकारने संसदेत दिले हे उत्तर
- नवाब मलिकांना तुरुंगात टाकल्यावर शरद पवार यांनी पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखविली नाही, इम्तियाज जलील यांचा सवाल
- अमेरिका, ब्रिटनमध्येही पेट्रोलचे दर ५० टक्यांनी वाढले, भारतातील वाढ केवळ पाच टक्के, पेट्रोलियम मंत्र्यांनी केले स्पष्ट
- पतीच्या निधनानंतर व्यवसाय सांभाळला, आता आहे जगातील सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत
- देशात २१ ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी सुरू