• Download App
    गुजरातेत गॅसचा फुगा फुटून 30 जण जखमी; उंझामध्ये गणेशमूर्तीच्या अभिषेक सोहळ्यादरम्यान अपघात, लहान मुलांनाही बसला फटका|Gas balloon burst in Gujarat, 30 injured; Accident during Abhishekam ceremony of Ganesha idol in Unjha, children also affected

    गुजरातेत गॅसचा फुगा फुटून 30 जण जखमी; उंझामध्ये गणेशमूर्तीच्या अभिषेक सोहळ्यादरम्यान अपघात, लहान मुलांनाही बसला फटका

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा गावात शनिवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील गणपतीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात शेकडो गॅसचे फुगे फुटले.Gas balloon burst in Gujarat, 30 injured; Accident during Abhishekam ceremony of Ganesha idol in Unjha, children also affected

    यामध्ये 30 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींना ब्राह्मणवाडा आणि उंझा येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



    फटाक्यांमुळे गॅस भरलेल्या फुग्यांना आग लागली

    ब्राह्मणवाड्यातील गणपतीच्या मूर्तीच्या अभिषेक सोहळ्याला आजूबाजूच्या गावातील भाविकही मोठ्या संख्येने पोहोचले होते. काही लोक गॅसचे फुगे घेऊन उभे होते, तर जवळपास काही लोक फटाके फोडून आनंद साजरा करत होते.

    दरम्यान, फटाक्यांची आग फुग्यांपर्यंत पोहोचली आणि सर्व फुगे एकाच वेळी फुटल्याने मोठा स्फोट होऊन पळापळ झाली.

    5 जण गंभीर जखमी

    गंभीर जखमी झालेल्या 5 जणांवर घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात आले. काही जखमींना स्थानिक रुग्णालयात आणि शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, उंझा येथे रेफर करण्यात आले आहे. दरम्यान, उंझा येथील लायन्स रुग्णालयात सुमारे 20 रुग्ण दाखल झाले आहेत.

    Gas balloon burst in Gujarat, 30 injured; Accident during Abhishekam ceremony of Ganesha idol in Unjha, children also affected

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!