• Download App
    अहो "महान" बुद्धिबळपटू, आधी रायबरेली जिंकून दाखवा; गॅरी कास्पारोव्हने उडवली राहुल गांधींची खिल्ली!! Garry Kasparov made fun of Rahul Gandhi

    अहो “महान” बुद्धिबळपटू, आधी रायबरेली जिंकून दाखवा; गॅरी कास्पारोव्हने उडवली राहुल गांधींची खिल्ली!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाड आणि रायबरेली मधले उमेदवार राहुल गांधी हे महान बुद्धिबळपटू असल्याचा “जावईशोध” काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी लावल्यानंतर सोशल मीडियात राहुल गांधींची खिल्ली उडवायची स्पर्धा सुरू झाली. यामध्ये जगातील महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह यांनी देखील उडी घेतली.Garry Kasparov made fun of Rahul Gandhi

    अहो “महान” बुद्धिबळपटू पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्याआधी रायबरेली जिंकून दाखवा, मगच सर्वोच्च पदाला आव्हान द्या, अशा शब्दांमध्ये गॅरी कास्पारोव्ह यांनी राहुल गांधींची ट्विटर वरून खिल्ली उडवली. त्यामुळे सोशल मीडियात विशेषतः काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली. राहुल गांधींच्या बुद्धिबळ कौशल्याची केवळ भारतातच माहिती नाही, तर जगात माहिती आहे, असा “साक्षात्कार” काँग्रेसला झाला आणि काँग्रेसची सोशल मीडिया टीम कास्पारोव्ह यांना ट्रोल करायला धावली. परंतु, आपण राहुल गांधींच्या बुद्धिबळ कौशल्याविषयी सहज आणि किरकोळ कमेंट केली. यामध्ये कुठली राजकीय कमेंट नव्हती असा खुलासा कास्पारोव्ह यांनी केला.

    गॅरी कास्पारोव्ह हे मूळचे रशियन असले तरी ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे प्रकट टीकाकार मानले जातात ते सध्या क्रोएशियामध्ये स्थायिक झाले आहेत.

    पण राहुल गांधी “महान” बुद्धिबळपटू आहेत. त्यांच्या अन्य काही चाली बाकी आहेत. योग्य वेळी ते त्या चाली खेळतील, अशी टिप्पणी जयराम रमेश यांनी केली होती, ती मात्र यानिमित्ताने काँग्रेसच्या अंगलट आली.

    Garry Kasparov made fun of Rahul Gandhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    yogi-adityanath : ‘आम्ही कुणालाही छेडणार नाही, पण जर का कुणी आम्हाला छेडलंच तर…’

    Turkey and Azerbaijan : तुर्कस्तान आणि अझरबैजानचे नापाक कृत्य, पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे भारतीयांकडून पर्यटनावर बहिष्कार

    United nations : भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर संयुक्त राष्ट्राकडून आली पहिली प्रतिक्रिया, म्हटले…