• Download App
    दिल्लीच्या रोहिणी कोर्टात गँगवार; गँगस्टर गोगी, दोन हल्लेखोरांसह चौघांचा मृत्यू|Gangwar in Delhi's Rohini Court; Gangster Gogi, four killed along with two assailants

    दिल्लीच्या रोहिणी कोर्टात गँगवार; गँगस्टर गोगी, दोन हल्लेखोरांसह चौघांचा मृत्यू

    दिल्लीच्या रोहिणी कोर्ट परिसरात शुक्रवारी गँगवॉर झाले. हल्लेखोरांनी गोळी झाडून गँगस्टर जीतेंद्र गोगीची हत्या केली. या गँगवॉरमध्ये गोगी व त्याच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांसह एकूण चार जण मारले गेले आहेत. गोळीबारात 3 ते 4 जण जखमी झाले आहेत.Gangwar in Delhi’s Rohini Court; Gangster Gogi, four killed along with two assailants


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: दिल्लीच्या रोहिणी कोर्ट परिसरात शुक्रवारी गँगवॉर झाले. हल्लेखोरांनी गोळी झाडून गँगस्टर जीतेंद्र गोगीची हत्या केली. या गँगवॉरमध्ये गोगी व त्याच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांसह एकूण चार जण मारले गेले आहेत. गोळीबारात 3 ते 4 जण जखमी झाले आहेत.

    गँगस्टर गोगी याला न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते. गोगीवर सलग तीन गोळ्या झाडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रायवल टिल्लू टोळीचे दोन हल्लोखोर वकिलांच्या वेशात आले होते.



    त्यांनी न्यायालयाच्या खोली क्रमांक 207 मध्ये न्यायाधीश गगनदीप सिंह यांच्यासमोर गोगीवर गोळ्या झाडल्या. गोगीच्या सुरक्षेसाठी असलेल्या दिल्ली पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल हल्लेखोरांवर 25 ते 30 गोळ्या झालल्याने दोन्ही हल्लेखोर जागीच ठार झाले, तर गोगीचा रूग्णालयात मृत्यू झाला.

    Gangwar in Delhi’s Rohini Court; Gangster Gogi, four killed along with two assailants

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार